Pawan Kalyan’s wife Anna Konidela offers her hair at Tirumala temple in a traditional devotional act. sarkarnama
देश

Anna Konidel : उपमुख्यमंत्र्याच्या पत्नीने केले मुंडन, काय आहे कारण? सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Anna Konidela offers hair at Tirumala after darshan of Lord Venkateswara : अन्ना कोनिडेला यांनी मुलाच्या सुरक्षेसाठी तिरुमला मंदिरात नवस केला होता. या नवसानंतर त्या रविवारी तिरुमला मंदिरात गेल्या होत्या.

Roshan More

Pawan Kalyan wife : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री कल्याण पवन यांची पत्नी अन्ना कोनिडेला यांनी तिरुमला मंदिरात जाऊन मुंडन केले आहे. मुंडन करत असलेले त्यांचे फोटो पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून शेअर देखील करण्यात आले आहे. अन्ना यांनी आपले केस दान का केले? याचे कारण देखील जनसेना पक्षाकडून सांगण्यात आले आहे.

मागील आठवड्यात पवन कल्याण आणि अन्ना यांचा मुलगा मार्क शंकर मोठ्या दुर्घटनेमध्ये वाचला. त्याचे हात भाजले होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अन्ना कोनिडेला यांनी त्याच्या सुरक्षेसाठी तिरुमला मंदिरात नवस केला होता. तो नवस पूर्ण करण्यासाठी त्यांनी मंदिरात जाऊन मुंडन करत आपले केस दान केले.

जनसेना पक्षाकडून जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अन्नांनी पद्मावती कल्याण कट्ट्यावर आपले केस अर्पण केले आणि विधीमध्ये भागा घेतला. तिरुमलाच्या भगवान व्यंकटेश्वर यांच्यावर अन्ना यांची श्रध्दा आहे. मंदिरातील वराह स्वामी दर्शनानंतर त्यांनी आपले केस कल्याण कट्ट्यात दान केले.

मार्क शंकर जखमी

पवन कल्याण आणि अन्ना यांचा मार्क शंकर हा मुलगा आठ वर्षांचा आहे. तो शिक्षणासाठी सिंगापूरला असतो. तेथे लागेल्या आगीत मुलांच्या हाता पायाला भाजले. मार्क शंकर देखील यामध्ये जखमी झाला. त्यानंतर पवन कल्याण हे तातडीने सिंगापूरला रवाना होणार होते. मात्र, आदिवासींच्या गावाला भेट देण्याचा शब्द त्यांनी दिला होता. त्यामुळे आपला शब्द पूर्ण करण्यासाठी ते आदिवासींच्या गावामध्ये जाऊन त्यांची भेट घेत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT