Andhra Pradesh : एखादी पैज लावल्यानंतर किंवा चॅलेंज दिल्यानंतर ते पूर्ण करण्याचे धाडस अनेकजण दाखवत नाहीत. त्यामध्ये राजकीय नेत्यांचा पहिला नंबर असतो, हे वेगळं सांगायला नको. पण एका नेत्याने आपलं चॅलेंज पूर्ण करताना स्वत:चं नाव बदललं आहे.
आंध्र प्रदेशातील वायएसआर काँग्रेसचे नेते मुद्रगडा पद्मनाभम यांनी हे चॅलेंज पूर्ण केले आहे. दक्षिणेतील सुपरस्टार व आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा निवडणुकीत पराभव झाला नाही तर मी नाव बदलेन, असे चॅलेंज त्यांनी दिले होते. पण पवन कल्याण विजयी झाले अन् उपमुख्यमंत्र्यांची शपथही घेतली.
चॅलेंज हरल्यानंतर पद्मनाभम यांनी अधिकृतपणे आपले नाव बदलले आहे. आता त्यांनी पदमनाभा रेड्डी असे नामकरण केले आहे. ते 70 वर्षांचे आहे. नावात बदलाची नोंद सरकारी गॅझेटमध्येही करण्यात आली आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी पवन कल्याण यांचा पराभव करण्याचा दावा केला होता. पीथापुरम विधानसभा मतदारसंघातील ते नेते आहेत.
मीडियाशी बोलताना रेड्डी म्हणाले, ‘कुणीही मला नाव बदलण्यासाठी दबाव टाकला नाही. मी माझ्या इच्छेने नाव बदलले आहे.’ मात्र, पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप रेड्डी यांनी केला आहे.
पवन कल्याण यांचे चाहते सातत्याने माझ्याबाबत अपशब्द वापरत आहेत. हे योग्य नाही. शिव्या देण्याऐवजी आम्हाला संपवून टाका, असेही रेड्डी म्हणाले. ते माजी मंत्री असून कापू समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन केले होते. विधानसभा निवडणुकीआधीच ते जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षात दाखल झाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.