Pawan Kalyan : मुलगा आगीत गंभीर जखमी, तरीही पवन कल्याण यांनी आधी आदिवासींना दिलेला शब्द पाळला; आगीचा Video समोर

Pawan Kalyan Son Burn Injury Singapore : पवन कल्याण यांचा मुलगा मार्क शंकर हा आठ वर्षांचा असून सिंगापूरमध्ये शिक्षण घेत आहे. त्याच्या शाळेत भीषण आग लागली होती.
Pawan Kalyan
Pawan KalyanSarkarnama
Published on
Updated on

Andhra Pradesh News : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मुलगा आगीत गंभीर जखमी झाला आहे. सिंगापूरमधील शाळेत लागलेल्या आगीत मुलाच्या हाता-पायांना भाजले असून श्वास घेण्यासही त्रास होत असल्याचे माहिती आहे. एवढी गंभीर घटना घडलेली असतानाही पवन कल्याण यांनी आदिवासींना दिलेला शब्द पाळत सिंगापूरला जाण्याचा प्लॅन पुढे ढकलला.

पवन कल्याण यांचा मुलगा मार्क शंकर हा आठ वर्षांचा असून सिंगापूरमध्ये शिक्षण घेत आहे. त्याच्या शाळेत भीषण आग लागली होती. त्यात त्याच्या पायाला आणि हाताला भाजले आहे. तसेच धुरामुळे श्वास कोंडल्याने त्रास होत आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Pawan Kalyan
Narendra Modi : अर्थमंत्र्यांना मी सांगतो, इन्कम टॅक्सवाले घरी येणार नाहीत! मोदींनी ‘त्या’ व्यक्तीला दिला दिलासा

पवन कल्याण यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतरही त्यांनी नियोजित दौरा सुरूच ठेवला. पक्षाच्या नेत्यांनी त्यांना दौरा रद्द करून तातडीने सिंगापूरला जाण्याचा सल्ला दिला होता. पण पवन कल्याण यांनी आदिवासींना दिलेला शब्द पाळण्याचा निर्णय घेत दौरा पूर्ण करूनच मुलाकडे जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

आंध्र प्रदेशातील अलुरी सीताराम राजू जिल्ह्यात पवन कल्याण यांचा आज नियोजित दौरा होता. या जिल्ह्यातील कुरिडी जिल्ह्यातील आदिवासींना भेटण्याचे आश्वासन त्यांनी यापूर्वीच दिले होत. या गावात जाऊन तेथील नागरिकांना भेटून त्यांच्या समस्या आधी जाणून घेईन, असे पवन कल्याण यांनी म्हटल्याचे त्यांच्या पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले.

आदिवासींना भेटल्यानंतर ते नियोजनानुसार काही विकास प्रकल्पांचेही उद्घाटन करतील. नंतर ते थेट विजाग विमानतळावरून सिंगापूरसाठी रवाना होतील, असेही पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विशाखापट्टणम येथील इको-टुरिझम बैठकीचेही नियोजन होते. पण या बैठकीला ते जाणार नसल्याचे स्पष्ट झाले.

Pawan Kalyan
Petrol-Diesel Price : केंद्र सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय! , आता पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढणार?

आंध्र प्रदेशचे शिक्षणमंत्री नारा लोकेश यांनीही सिंगापूरमधील शाळेला लागलेल्या आगीला दुजोरा दिला. त्यांनी सोशल मीडियात केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, सिंगापूरमधील शाळेत लागलेल्या आगीच्या घटनेबाबत ऐकून स्तब्ध झालो. या आगीत पवन कल्याण अण्णा यांचे पुत्र मार्क शंकर जखमी झाले आहेत. तो लवकर बरा व्हावा, यासाठी प्रार्थना करतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com