Donal Trump_Jeffery Epstine 
देश

Photos: अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प अन् एपस्टिनचा टायटॅनिकच्या पोझमधला पुतळा चर्चेत! राजधानीतच कलाकारानं काढले वाभाडे

जगभरात खळबळ उडवून देणाऱ्या एपस्टिन फाईल्सचा कुख्यात सर्वोसर्वा जेफरी एपस्टिन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एकत्रित पुतळा सध्या प्रचंड चर्चेत आला आहे.

Amit Ujagare

नवी दिल्ली : जगभरात खळबळ उडवून देणाऱ्या एपस्टिन फाईल्सचा कुख्यात सर्वोसर्वा जेफरी एपस्टिन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एकत्रित पुतळा सध्या प्रचंड चर्चेत आला आहे. अमेरिकेच्या राजधानीत अर्थात वॉशिंग्टन डीसी इथं एका कलाकारानं हा पुतळा उभारला आहे. जगभरातील दिग्गजांना अडकवणाऱ्या एपस्टिनच्या सेक्स रॅकेट प्रकरणात ट्रम्प यांचंही नाव आल्यानं तसंच एपस्टिनसोबतचे त्यांचे फोटो समोर आल्यानं अमेरिकेतही नाराजी आहे. त्यातूनच एका कलाकारानं या दोघांचा टायटॅनिक सिनेमातील आयकॉनिक पोझमध्ये हा पुतळा साकारुन अक्षरशः वाभाडे काढले आहेत.

Donal Trump_Jeffery Epstine

अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी शहरातील मध्यवर्ती चौकातच मंगळवारी अचानक हा पुतळा उभारल्याचं दिसून आलं. चौकातून जाणारा प्रत्येकजण हा पुतळा न्याहाळताना दिसतो आहे, या पुतळ्यासंबंधी माहिती देताना त्याला 'दि किंग ऑफ वर्ल्ड' असं नावही देण्यात आलं आहे. त्याचबरोबर या पुतळ्याच्या मागे 'मेक अमेरिका सेफ अगेन' असे फलकही लावलेले आहेत. ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारात हा शब्द वापरण्यात आला होता, त्यावरुनच आता हा पुतळा साकारणाऱ्यानं ट्रम्प यांना टोला लगावला आहे.

Donal Trump_Jeffery Epstine

वादग्रस्त पुतळा

दि किंग ऑफ वर्ल्ड अर्थता ट्रम्प आणि एपस्टिनच्या या उपहासात्मक पुतळा आता वादग्रस्तही ठरला आहे. कारण या पुतळ्यात टॅयटॅनिक जहाजाचा जसा डेक होता तसाच डेक तयार करण्यात आला असून सिनेमातील हिरो जॅक आणि हिरोईन रोज ज्याप्रमाणं पोझ देतात त्याचप्रकारे ट्रम्प हे एपस्टिनच्या मागे उभे असून दोघांनीही आपले हात फैलावलेले आहेत. या पुतळ्याच्या खाली एक फलक लावलेला आहे त्यात म्हटलं की, जॅक आणि रोज यांची दुःखद प्रेम कहानी, भव्यदिव्य तरंगत्या हॉटेलचा प्रवास, आवाज करणाऱ्या सेलिब्रेशनच्या पार्ट्या आणि गुप्त नग्न चित्रांवर आधारित हा सिनेमा होता. पण हा पुतळा ट्रम्प आणि जेपस्टिन यांच्या संबंधांचा सन्मान करते. यातही टायटॅनिक सिनेमाप्रमाणं एक अशी मैत्री आहे जी भोगविलासी प्रवास, पार्ट्या आणि गुप्त चित्रांवर आधारीत होती.

Donal Trump_Jeffery Epstine

'दि सिक्रेट हँडशेक' नामक एका अज्ञात समुहाद्वारे हा पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याबरोबरच ट्रम्प यांनी २००३ मध्ये एपस्टिन यांना त्यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त लिहिलेल्या एका कथित पत्राची देखील चर्चा सुरु झाली आहे. २०२५ मध्ये पहिल्यांदाच वॉल स्ट्रीट जर्नलनं उघड केलेल्या या पत्रानुसार, अनेक आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी होत्या. या पत्रात एका महिलेची आकृती बनवण्यात आली असून यामध्ये टाईप केलेले शब्द असून खाली ट्रम्प यांची सही आहे.

या पत्रात म्हटलं की, मित्रा ही एक एक अद्भत गोष्ट आहे. जेफरी आणि माझ्यामद्ये काही गोष्टी कॉमन आहेत. शेवटी यात म्हटलं की, वाढदिवसाच्या शुभेच्छा. देवाकडं हीच इच्छा आहे की, प्रत्येक दिवशी आणखी एक अद्भुत रहस्य कायम राहावं. पण हे पत्र खोट असल्याचं ट्रम्प यांनी दावा केला आहे. तसंच वॉल स्ट्रिट जर्नलवर १० अब्ज डॉलरचा मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. व्हाईट हाऊसनं हे स्पष्ट केलं आहे की, या पत्रातील स्वाक्षरी ही बनावट आहे. यापूर्वी देखील 'दि सिक्रेट हँडशेक' या गटानं यापूर्वीही ट्रम्प आणि एपस्टिनचा हातात हात घालून उभे असल्याचा पुतळा लावला होता. हा पुतळा जागेवरुन तातडीनं हटवण्यातही आला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT