PM Modi On Operation Sindoor sarkarnama
देश

PM Modi : 'ऑपरेशन सिंदूरला आता फक्त स्थगित, यापुढे पुन्हा...' पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानसह इतरांना ठणकावले

Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर' नंतर देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, भारताने दहशतवाद्यांना योग्य उत्तर दिले असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी यावेळी पाकिस्तानने दहशतवादाला प्रोत्साहन देणे थांबवले नाही तर भारत शांत बसणार नाही असा इशारा दिला आहे.

Aslam Shanedivan

New Delhi, 12 May : भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामनंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (ता. 12 मे) देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी दहशतवाद मुद्द्यावर पुन्हा एकदा पाकिस्तानला इशारा देताना, त्यांनी दहशतवाद थांबवावा अन्यथा चोख प्रत्युत्तर दिले जाईल असे म्हटलं आहे.

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानमध्ये मोठी कारवाई केली. भारतीय लष्कराने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. या हल्ल्यात 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा झाला. यानंतर पुन्हा पाकिस्तानने भारतावर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय बनावटीच्या शस्त्रांच्या मदतीने तो हाणून पाडण्यात आला. उलट भारतानं प्रत्युत्तरात केलेल्या हल्ल्यामध्ये पाकिस्तान एअरबेस आणि रडार सिस्टिम उद्ध्वस्त झाली. यानंतर आज पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन सिंदूरबद्दल एक मोठे विधान करताना पाकिस्तानसह त्यांना साथ देणाऱ्या देशांना थेट इशारा दिला आहे.

त्यांना महाग पडले

मोदींनी ऑपरेशन सिंदूर हे फक्त काही काळासाठी थांबवण्यात आलं आहे. पण पाकिस्तान नको ती भूमिका घेतल्यास, या पुढे कोणतीही दहशतवादी कारवाई केल्यास अथवा गोळीबार केल्यास ते त्यांना महाग पडले. आम्ही पाकिस्तानच्या दहशतवादी आणि सैन्य ठिकाण्यावर प्रत्युत्तरात हल्ले केले होते. पण जर येत्या काळात भारत दहशतवाद अजिबात सहन करणार नाही. जर कोणी भारतावर हल्ला केला तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिले जाईल. भारत आता स्वतःच्या हिमतीवर आणि रक्षणासाठी काम करेल. तसेच जर पाकिस्तानने दहशतवादाला प्रोत्साहन देणे थांबवले नाही तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असाही इशारा पंतप्रधान मोदींनी दिला आहे.

ताकद आणि संयम दोन्ही पाहिले

अलिकडच्या काळात भारताने आपली ताकद आणि संयम जगाला दाखवून दिले आहे. 'ऑपरेशन सिंदूर'चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्या शूर सैनिकांनी मोठे शौर्य दाखवले. त्यांनी आपले शौर्य, धाडस आणि शौर्य देशातील प्रत्येक आई, बहीण आणि मुलीला समर्पित केले. ऑपरेशन सिंदूर हे केवळ नाव नसून ते देशाच्या कोटी कोटी लोकांची भावनाचं प्रतिबिंब आहे. ती न्यायची अखंड प्रतिज्ञा असून ही प्रतिज्ञा आम्ही 6 मे रात्री उशिरा आणि 7 मेच्या सकाळी जगाने अनुभवली आहे.

भारतीय सैन्याने पाकिस्तानातील आतंकाच्या अड्ड्यावर, त्यांच्या ट्रेनिंग सेंटरवर हल्ला करत ते उद्धवस्त केले. असे काही होईल असे दहशतवाद्यांनी स्वप्नातही वाटले नसेल. पण आम्ही निर्णय घेतला. या निर्णयामुळे फक्त दहशतवाद्यांचे अड्डेच नाहीतर त्यांचं आवसानही गळाले. तर आता 'ऑपरेशन सिंदूर' फक्त थांबवले असून पाकिस्तानने कोणताही वेगळा विचार करू नये अन्यथा त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील असे म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT