PM Narendra Modi Sarkarnama
देश

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकसभा सदस्यांना कडक सूचना; काय आहे कारण...

Amol Sutar

PM Narendra Modi : देशात प्रभू श्रीराम मंदिराचा उद्घाटन सोहळा येत्या 22 तारखेला पार पडणार आहे. भक्तिमय आणि भावपूर्ण असलेल्या या सोहळ्यादरम्यान देशात शांतता राहावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांना कडक सूचना केल्या आहेत. यावेळी प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी देशात गडबड किंवा वातावरण बिघडू नये, याची काळजी घेण्याची जबाबदारी संसदीय मतदारसंघात मंत्री व सदस्यांवर दिली आहे.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मंत्र्यांना कडक सूचना दिल्या आहेत. यावेळी भाषणबाजी टाळून शिष्टाचार जपण्याच्या सूचना दिल्या आहेत. पंतप्रधानांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, या प्रकरणात विश्वास असला पाहिजे, आक्रमकता नाही. पंतप्रधान मोदींच्या या कडक सूचनेनंतर आता भारतीय जनता पक्षाचे नेते कामाला लागले आहेत.

त्यांनी आपापल्या भागातील लोकांना 22 जानेवारीनंतर रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी आणावे आणि जास्तीत जास्त लोकांना रामलल्लाचे आशीर्वाद मिळावेत, असेही पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या या कडक सूचनेनंतर आता भारतीय जनता पक्षाचे नेते कामाला लागले आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आज त्यांच्या ट्विटर हँडलवरून एक भजन शेअर केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रसिद्ध गायक हरिहरन यांचे भजन शेअर करताना पंतप्रधानांनी लिहिले आहे की, हरिहरनजींच्या अप्रतिम सुरांनी सजवलेले हे राम भजन सर्वांना भगवान श्रीरामाच्या भक्तीत तल्लीन करून टाकणारं आहे. लोकांनी या भजनाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. कालही पंतप्रधानांनी ट्विटद्वारे एक भजन शेअर केले होते.

रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची प्रत्येकजण वाट पाहत असल्याचे पंतप्रधानांनी लिहिले होते. याआधी तुम्ही विकास जी आणि महेश कुकरेजाजी यांचे राम भजन अवश्य ऐकावे, रामलल्ला यांच्या भक्तीने परिपूर्ण आहेत.

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT