Praful Patel Sarkarnama
देश

NCP News : एका आठवड्यात राजीनामा द्या; प्रफुल पटेलांचा राष्ट्रवादीच्या एका मंत्र्यासह दोन आमदारांना आदेश

Praful Patel Letter To MLA : पक्षविरोधी कारवाई केल्याचे कारण सांगून एका मंत्र्यासह दोन आमदारांना एक आठवड्यात राजीनामा देण्याचा आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी दिले आहेत.

Vijaykumar Dudhale

New Delhi, 19 July : पक्षविरोधी कारवाई केल्याचे कारण सांगून एका मंत्र्यासह दोन आमदारांना एक आठवड्यात राजीनामा देण्याचा आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी दिले आहेत. पटेल यांनी या दोन्ही आमदारांना पत्र पाठवून हा आदेश दिलेला आहे, त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी काही दिवसांपूर्वी हे पत्र लिहिलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर केरळची राष्ट्रवादी काँग्रेस ही ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत राहिली आहे. केरळमधील राष्ट्रवादी काँग्रेस ही सत्ताधारी लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट (एलडीएफ) यांच्यासोबत सत्तेत सहभागी आहे.

केरळ राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष थॉमस के. थॉमस, केरळ सरकारमधील वनमंत्री ए. के. ससींद्रन यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार हे शरद पवार यांच्यासोबत आहेत. हे सर्वजण केरळमधील सत्ताधारी लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटसोबत आहेत. पक्षफुटीनंतर अजित पवार यांच्या पाठीशी उभे राहिलेले प्रफुल पटेल यांनी केरळ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष थॉमस यांना पत्र पाठविले आहे. त्यात पत्रात पटले यांनी म्हटले आहे की, केरळमधील आमदार हे २०२१ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर विधानसभेची निवडणूक लढवून जिंकलेले आहेत. हे आमदार सध्या पक्षविरोधात कारवाया करत आहेत, असा दावा पटेल यांनी पत्रात केलेला आहे.

प्रदेशाध्यक्ष थॉमस यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. एका आठवड्यात त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा लोकप्रतिनिधीत्व अधिनियम आणि पक्षांतर विरोधी कायद्याच्या माध्यमातून अपात्रतेची कारवाई करण्याचा आदेश देण्यात येईल, असाही इशारा पटेल यांनी पत्रातून दिला आहे.

दरम्यान, थॉमस यांच्यासोबत वन मंत्री. ए. के. ससींद्रन यांनाही प्रफुल पटेल यांनी पक्षविरोधी कारवायाचे कारण देऊन पक्षातून निलंबित करण्याचा इशारा दिलेला आहे. पटेल यांनी पाठवलेल्या पत्रावर केरळ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष थॉमस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. केरळची राष्ट्रवादी ही पूर्वीपासून ज्येष्ठ नेते शरद पवार यांना नेमा मानत आलेली आहे. त्यांनाच नेता मानून आम्ही काम करत आहेात, त्यामुळे पटेल यांच्या पत्राकडे आम्ही दुर्लक्ष करत आहोत. कारण प्रफुल पटेल यांचा आमच्या पक्षाशी काहीही संबंध नाही, असे थॉमस यांनी म्हटलेले आहे.

पक्षांतर विरोधी कायद्याच्या कारवाईबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय करायचा आहे, असे प्रदेशाध्यक्ष थॉमस यांनी म्हटले आहे. केरळचे वनमंत्री ससींद्रन यांनीही केरळ राष्ट्रवादी काँग्रेस प्रफुल पटेल यांच्या त्या पत्राचा विचार करत नाही. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेनुसार काम करत आहोत आणि काम करत राहू, असे वनमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT