Rahul Gandhi Manoj Narwane PM Modi .jpg Sarkarnama
देश

Rahul Gandhi News: राहुल गांधींनी मोदी सरकारला ज्या पुस्तकावरुन पळताभुई थोडी केली, त्यावर मनोज नरवणेंची पहिली प्रतिक्रिया आली समोर

Unpublished Military Book Issue: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. एवढंच नव्हे तर त्यांनी देशाचे माजी लष्करप्रमुखांच्या पुस्तकाचाच दाखला देत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह त्यांच्या सरकारलाही पळताभुई थोडी केल्याचं दिसून आलं होतं.

Deepak Kulkarni

New Delhi News: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. एवढंच नव्हे तर त्यांनी देशाचे माजी लष्करप्रमुखांच्या पुस्तकाचाच दाखला देत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह त्यांच्या सरकारलाही पळताभुई थोडी केल्याचं दिसून आलं होत.

एव्हाना त्यांच्यासह विरोधकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे संसदेचं कामकाज तर वारंवार तहकूब करावंच लागलं, शिवाय मोदींनाही लोकसभेत आपलं भाषण करता आलं नव्हतं. पण या सगळ्या घडामोडीनंतर आता ज्या पुस्तकावरुन गदारोळ माजला होता. त्याच्या लेखकाची अर्थात माजी लष्करप्रमुख मनोज नरवणेंची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या 'फोर स्टार ऑफ डेस्टिनी' या त्यांच्या आत्मचरित्रावरून सध्या देशाच्या राजकारणात मोठा वादंग निर्माण झाल्याचं चित्र आहे. लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हे पुस्तक वाचण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते अद्याप प्रकाशित झालं नसल्याचा दावा करत संरक्षण मंत्र्यांसह सत्ताधारी पक्षानं त्यांना रोखल्याचं दिसून आलं होतं. तसेच यावरुन संसद तहकूब करण्याची वेळ आली होती.

पण तरीही विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना आपले म्हणणे मांडता आले नाही. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ही लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलता आलं नव्हतं. आता या वादावर खुद्द जनरल नरवणे यांचीच पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.त्यामुळे पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे.

संसदेतील या सर्व घडामोडींनंतर आता जनरल मनोज नरवणे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर आपली प्रतिक्रिया दिली आहे. पण त्यांनी यावेळी त्यांचं पुस्तक प्रकाशित करणाऱ्या पेंग्विन प्रकाशनाचंच स्पष्टीकरण री-पोस्ट केलं आहे. त्यांनी अवघ्या 6 शब्दांतच या सर्व प्रकरणावर भाष्य केलं आहे.

त्यात ते "The current status of the book" (पुस्तकाची सद्यस्थिती ही आहे) असं म्हटलं आहे. याबाबत प्रकाशकानं दिलेली माहिती अधिकृत असल्याचं स्पष्ट करत संबंधित पुस्तक अद्याप प्रकाशित झालं नसल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

पेंगुईन इंडिया या प्रकाशन संस्थेनं आपल्या निवदेन प्रसिध्द केलं आहे. त्यात ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ सध्या चर्चेत आहे आणि मीडियातील बातम्या पाहता आम्ही हे स्पष्ट करु इच्छितो की, भारतीय सैन्याचे माजी प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाचे अधिकार आमच्याकडे आहेत. या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं नाही. पेंगुईन इंडियाद्वारे पुस्तकाची कोणतीही कॉपी ( प्रिंट वा डिजिटल) कोणत्याही माध्यमातून जनतेसाठी उपलब्ध नसल्याचंही निवेदनाद्वारे स्पष्ट केलं आहे.

राहुल गांधी यांनी हे पुस्तक बाजारात उपलब्ध असल्याचा दावा खोडून करताना पेंगुईन प्रकाशनानं हे पुस्तक अद्याप प्रकाशित झालं नसल्याचं अधोरेखित केलं आहे. यानंतर राहुल गांधींनी जर हे पुस्तक छापले गेले नाही, तर माझ्या हातात काय आहे असा प्रश्न संसदेत उपस्थित केला होता.

तसेच पुस्तकावर बोलताना एक तर नरवणे अथवा प्रकाशक खोटे बोलत असल्याचा आरोप केला होता. दिल्ली पोलिसांनी आता याप्रकरणी गदारोळ माजल्यानंतर एफआयआर (FIR) नोंदवत तपासही सुरू केल्याचं समोर येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT