Rahul Gandhi sarkarnama
देश

Congress News : काँग्रेसला 'अच्छे दिन', भाजपच्याही पुढे

Roshan More

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीत भाजपने चारसौ पारचा नारा दिला आहे. प्रचारासाठी भाजप आणि काँग्रेसकडून वेगवेळ्या युक्ता वापरल्या जात आहेत. सोशल मीडियावर प्रचार करण्यात हे दोन्ही पक्ष मागे नाहीत. मात्र, सोशल मीडियावर भाजप स्ट्राँग असल्याच्या गृहितकाला प्रथमच धक्का बसला आहे. कारण राजकीय नेते आणि पक्ष यांच्या यु ट्यूब चॅनल पाहणाऱ्या दर्शकांची सहा एप्रिल ते 12 एप्रिल या आठवड्यातील संख्या जाहीर केली आहे. या दर्शक संख्येमध्ये पहिल्या तीनमध्ये भाजप आणि नरेंद्र मोदी यांचे यु ट्यूब चॅनल नाहीत.

सहा एप्रिल ते १२ एप्रिलला आठवड्यातील आकडेवारीनुसार एकुण दर्शकांपैकी तब्बल 31 टक्के दर्शकांनी राहुल गांधी यांचा यू ट्यूब चॅनेल पाहिला आहे. राजकीय नेते आणि पक्षांच्या पहिल्या दहा सर्वाधिक पाहिलेल्या चॅनेलमध्ये राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा यू ट्यूब चॅनेल पहिल्या क्रमांकावर आहे. तर, काँग्रेस पक्षाच्या यू ट्यूब चॅनेल तिसऱ्या क्रमांकावर आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नरेंद्र मोदींच चौथ्या स्थानी

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या यू ट्यूब चॅनलचे सबस्क्राईबर हे राहुल गांधी यांच्या यू ट्यूब चॅनलपेक्षा कितीतरी अधिक आहेत. मात्र, त्यांचे चॅनले पाहणाऱ्यांची संख्या एकूण दर्शकांपैकी केवळ 9 टक्के आहे. यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी चौथ्या क्रमांकावर आहेत.

आप दुसऱ्या क्रमांकावर

राहुल गांधी यांच्या यु ट्यूब चॅनल नंतर दर्शकांनी सर्वाधिक पसंती ही आम आदमी पार्टीच्या युट्यूब चॅनलला दिली आहे. या यादीत आप दुसऱ्या क्रमांकावर असून काँग्रेस पक्षाचा युट्यूब चॅनेल तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर भाजपचा यू ट्यूब चॅनल सहाव्या क्रमांकावर आहे. पहिला दहा क्रमांमध्ये युपी काँग्रेसचा देखील यू ट्यूब चॅनल आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT