Rahul Gandhi News : राहुल गांधींसोबत लग्न का नाही झाले? अदिती सिंहांनी दिलं उत्तर

Aditi Singh : वारंवार सांगूनही माध्यमे माझं लग्न राहुल गांधींच्या सोबत लावत होते. त्यामुळे राजकारण सोडण्याचा निर्णय मी घेतला होता. एक महिला असल्याची किंमत मला चुकवावी लागली होती, अशी खंत अदिती यांनी व्यक्त केली.
Rahul Gandhi  Aditi Singh :
Rahul Gandhi Aditi Singh :

Loksabha Election : काँग्रेस नेते राहुल गांधी कधी लग्न करणार, याची चर्चा माध्यमांमध्ये सुरू असते. राहुल गांधींनी देखील यावर थेट भाष्य करणे टाळत असतात. रायबरेलीच्या आमदार अदिती सिंह यांचे लग्न राहुल गांधीच्या सोबत होणार म्हणून चर्चा होती. त्यावर थेट अदिती सिंह यांनीच उत्तर दिले आहे.

Rahul Gandhi  Aditi Singh :
PM Modi Lok Sabha Election Interview : 'पंतप्रधान म्हणून नाही तर रामभक्त ...' राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यावर मोदींचं मोठं विधान

अदिती सिंह या काँग्रेसच्या (Congress) आमदार असताना 2017 मध्ये राहुल गांधी यांना भेटल्या होत्या. या भेटीनंतर राहुल गांधी आणि त्यांचा विवाह होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. 2021 मध्ये अदिती यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्या आधी अनेकदा अदिती यांनी त्यांचा आणि राहुल गांधी यांचा विवाह होणार नसल्याचे स्पष्ट केले होते.

मात्र, नुकत्याच अदिती यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या सोबत लग्न होणार या चर्चा मी अनेकदा फेटाळल्या होत्या. मात्र वारंवार पुन्हा त्याचीच चर्चा होत होती. मी अखेर राजकारणच सोडण्याचा विचार केला होता, असे अदिती सिंह म्हणाल्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वारंवार सांगूनही माध्यमे माझं लग्न राहुल गांधींच्या सोबत लावत होते. त्यामुळे राजकारण सोडण्याचा निर्णय मी घेतला होता. एक महिला असल्याची किंमत मला चुकवावी लागली होती, अशी खंत अदिती यांनी व्यक्त केली. लोकसभेच्या निवडणुकीमुळे आपण प्रचारात व्यग्र असल्याचेही अदिती म्हणाल्या.

राहुल गांधी लग्न कधी करणार?

राहुल गांधींना ते लग्न कधी करणार या संदर्भात भारत जोडो यात्रे दरम्यान प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी चांगली मुलगी मिळाली की लगेच लग्न करेल, असे राहुल गांधी म्हणाले होते. मुलगी सुंदर आणि प्रेमळ हवी. माझ्या आई वडिलांचे लग्न सुंदर झाले होते, असे देखील राहुल गांधी म्हणाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com