Rahul Gandhi Vs PM Modi Sarkarnama
देश

Rahul Gandhi on Modi: "मोदींमध्ये दम नाही, फक्त शोबाजी"; राहुल गांधींची कठोर शब्दांत टीका

Rahul Gandhi on Modi: नवी दिल्लीत राहुल गांधी यांनी ओबीसी समुदयासाठी आयोजित 'भागिदारी न्याय संमेलनात' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली.

Amit Ujagare

Rahul Gandhi on Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये दम नाही, त्यांची फक्त शोबाजी आहे, मी त्यांना प्रत्यक्ष भेटलेलो आहे, अशा शब्दांत लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर टीका केली आहे. नवी दिल्लीत ओबीसी समुदयासाठी आयोजित भागिदारी न्याय संमेलनात ते बोलत होते.

राहुल गांधी म्हणाले, "नरेंद्र मोदी हे काही मोठा समस्या नाहीत. मी तुम्हाला सांगतो लोकांनी त्यांना डोक्यावर चढवून ठेवलं आहे. मीडियावाल्यांनी मोदींचा फुगा बनवलाय आहे फक्त, बाकी त्यांची काहीही अडचण नाही. आधीतर मी त्यांना कधी भेटलो नव्हतो पण आता दोन-तीन वेळा मी त्यांना भेटलो आहे. त्यांची गोष्ट मला आता कळाली आहे, काहीही खास नाही त्यांच्यात. फक्त शोबाजी आहे, दम नाही त्यांच्यात. तुम्ही त्यांना भेटलेले नाहीत, मी भेटलो आहे. खोलीत बसून त्यांच्याशी गप्पा मारल्यात मी"

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या ट्विटरवरुन राहुल गांधी यांचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये राहुल गांधी ओबीसी समुदयाच्या संमेलनात व्यासपीठावरुन बोलत आहेत. यावेळी मोठा जनसमुदाय समोर बसलेला आहे. यामध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख निघताच त्यांची फक्त शोबाजी असतो ठोस काहीही काम नसतं, अशा कठोर शब्दांत त्यांच्यावर टीका केली.

दरम्यान, राहुल गांधी यांच्या विधानावरुन आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. भाजपकडून अद्याप त्यांच्या विधानावर कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT