Vice President Election: उपराष्ट्रपतीपदासाठी INDIA आघाडीचा कोण असणार उमेदवार? कुठलं नाव चर्चेत? काय असेल स्ट्रॅटेजी?

Vice President Election: जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर आता उपराष्ट्रपतीपदासाठी नव्यानं निवडणूक पार पडणार आहे.
I.N.D.I.A Alliance
I.N.D.I.A AllianceSarkarnama
Published on
Updated on

Vice President Election: जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर आता उपराष्ट्रपतीपदासाठी नव्यानं निवडणूक पार पडणार आहे. यासाठी सत्ताधारी पक्षासोबतच विरोधक असलेल्या इंडिया आघाडीचा उमेदवारही लवकरच जाहीर होणार आहे. पण यावेळी इंडिया आघाडीनं वेगळी स्ट्रॅटेजी अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी इंडिया आघाडातील घटक पक्षांमधील अनेकांची नाव चर्चेत आहेत.

I.N.D.I.A Alliance
Ravindra Chavan: उद्धव ठाकरेंच्या भाजपसोबतच्या वाढत्या जवळीकतेवर रवींद्र चव्हाण यांचं महत्त्वाचं विधान; म्हणाले, शत्रूही...

गेल्यावेळी २०२२ मध्ये तृणमूल काँग्रेसनं उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर बहिष्कार घातला होता. कारण इंडिया आघाडीनं मार्गारेट अल्वा या काँग्रेसच्या व्यक्तीला उमेदवारी जाहीर केली होती. घटक पक्षांशी चर्चा न करता हा उमेदवार दिला असल्याचा आरोप करत तृणमूलनं मतदानावर बहिष्कार घातला होता. तृणमूलच्या ३४ खासदारांनी त्यांना मतदान केलं नव्हतं. तर दोन बंडखोरांनी भाजप्रणित एनडीएचे उमेदवार असलेल्या जगदीप धनखड यांना उमेदवारी दिली होती.

यामुळं धनखड यांना ५२८ तर अल्वा यांना १८२ मतं मिळाली होती. जर तृणमूलसह सर्व विरोधीपक्षांनी अल्वा यांना मतदान केलं असतं तर त्यांना १९८ मतं पडली असती. इंडिया आघाडीतील इतर घटक पक्षांनी काँग्रेसला इशारा दिला होता की काँग्रेसनं आमच्यावर आपला उमेदवार लादू नये. या इतर पक्षांमध्ये आप, वायएसआर काँग्रेस, बीजेडी, बीआरएस, एमआयएम आणि आझाद समाज पार्टी (कांशिराम) यांचा समावेश होता.

I.N.D.I.A Alliance
Operation Sindoor: पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर संदर्भातील सगळी उत्तरं मिळणार?सोमवारी संसदेत होणार दीर्घ चर्चा

दरम्यान, यापार्श्वभूमीवर आता इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या एकमतानं उमेदवार देण्यात येणार आहे. यंदा इंडिया आघाडीकडं ३२३ मत आहेत. यामध्ये आपच्या १२ खासदारांचाही समावेश आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत चांगलं यश मिळाल्यानं विरोधकांकडं खासदारांची चांगली संख्या आहे. जर सध्या स्वतंत्र असलेल्या वायएसआर काँग्रेस, बीआरएस, बीजेडी, एमआयएम, आझाद समाज पार्टी, बसपा, व्हीओपीपी आणि झेडपीएम या पक्षांची जर इंडिया आघाडीला साथ मिळली तर त्यांची ३० मत इंडिया आघाडीला मिळू शकतात.

I.N.D.I.A Alliance
Maharashtra Cabinet : विधानसभा अध्यक्षपद अन्‌ मंत्रिमंडळ फेरबदलबाबत मुनगंटीवार स्पष्टच बोलले; म्हणाले, ‘सध्यातरी शक्य...’

पण उपराष्ट्रपतीपदासाठी इंडिया आघाडीचा उमेदवार हा एनडीएचा उमेदवार जाहीर झाल्यानंतरच जाहीर होऊ शकतो. कारण आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना कुठल्याही परिस्थितीत एनडीएच्या उमेदवाराकडं राजकीय स्पेस जाऊ द्यायची नाही, अन्यथा यामुळं बिहारच्या जनतेमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो. तसंच तृणमूल काँग्रेसनंही म्हटलं आहे की, काँग्रेसनं इतर पक्षांच्या उमेदवाराचा उपराष्ट्रपतीपदासाठी विचार करावा. त्यामुळं तृणमूल काँग्रेसचाही उमेदवार उपराष्ट्रपतीपदासाठी निवडला जाऊ शकतो. पण एनडीएनं उमेदवार जाहीर केल्यानंतर इंडिया आघाडीचा उमेदवार लगेचच जाहीर होऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com