Vasundhara Raje News  Sarkarnama
देश

Vasundhara Raje News: वसुंधरा राजे झालरापाटणमधून पाचव्यांदा विजयी...

Mangesh Mahale

Rajasthan Assembly Results 2023: राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे (Vasundhara Raje) या झालरापाटण विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. झालावाड जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांपैकी भाजपने तीन आणि काँग्रेसने एक जागा जिंकली आहे. वसुंधरा राजे तब्बल 53193 मतांनी विजयी झाल्या आहेत. येथून त्या पाचव्यांदा विजयी झाल्या आहेत.

वसुंधरा राजे या 2003 पासून या जागेवरून विजयी होत आहेत. 2018 मध्ये त्यांनी तत्कालीन काँग्रेस नेते मानवेंद्र सिंह यांचा पराभव केला आणि 54 टक्के मतं मिळवली होती. राजस्थान निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (BJP) सध्या 110 ते 115 जागांवर आघाडीवर आहे.

सपोतरा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे हंसराज मीणा 43,834 मतांनी विजयी झाले. हंसराज मीणा यांना 1 लाख 11 हजार 385 मते मिळाली. काँग्रेसचे रमेशचंद मीणा यांना ६७ हजार ५५१ तर बसपचे विजयकुमार यांना ११ हजार ३०४ मते मिळाली. मनोहरठाणा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे गोविंद राणीपूर तर खानपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे सुरेश गुर्जर विजयी झाले.

राजस्थानमध्ये भाजप 116 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस 68 जागांवर आघाडीवर आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत संध्याकाळी 5.30 वाजता राजभवनात जाणार असल्याची माहिती आहे.

राजस्थान निवडणुकीचे ट्रेंड येत असताना भाजपचे सरकार स्थापन झाले, तर मुख्यमंत्री कोण होणार, अशी चर्चाही सुरू झाली आहे. वसुंधरा राजे मतदानात ज्या प्रकारे सक्रिय दिसत आहेत, त्यांनी मतमोजणीपूर्वी रात्री उशिरापर्यंत सभा घेतल्या. त्यामुळे मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार असल्याचे संकेत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT