Rajya Sabha Election  Sarkarnama
देश

Rajya Sabha Election: राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार? काँग्रेस आमदारांना 5 कोटींची ऑफर, भाजपचे 2 नेते अटकेत

Maharashtra Political News: राज्यसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं, यासाठी दुपारी ३ वाजेपर्यंतची मुदत होती. पण तत्पूर्वीच आमदारांचा घोडेबाजार चांगलाच तेजीत आल्याचं पाहायला मिळालं.

Amit Ujagare

Rajya Sabha Election: देशभरातील १० राज्यांमधील राज्यसभेच्या ३७ जागांसाठी आज आज मतदान पार पडलं, सकाळी ९ वाजता सुरु झालेल्या मतदानाची वेळ दुपारी ३ वाजेपर्यंतची होती. पण तत्पूर्वीच विविध राज्यांमध्ये आमदारांचा घोडेबाजार चांगलाच तेजीत आल्याचं पाहायला मिळालं. कर्नाटकातील एका घटनेत काँग्रेसच्या आमदारांना प्रत्येकी ५ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. ही ऑफर देणाऱ्या भाजपच्या २ नेत्यांवर पोलिसांनी अटकेचीही कारवाई केली.

नेमका विषय काय?

कर्नाटक पोलिसांनी रविवारी बाह्य बंगळुरुमधून भाजपच्या दोन नेत्यांना अटक केली आहे. त्यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी राज्यसभा निवडणुकीत क्रॉस वोटिंग करण्यासाठी ओडिशा काँग्रेसच्या ८ आमदारांना प्रत्येकी ५ कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला. ज्या भाजपच्या दोन नेत्यांना अटक करण्यात आली आहे, त्यांची नावं बीरेंद्र प्रसाद आणि ब्यातारायणपुरा सुरेश अशी आहेत. याप्रकरणातील आणखी दोन आरोपी अजित कुमार साहू आणि सिमांचल महाकुड हे फरार आहेत.

इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील बातमी देताना म्हटलं की, बंगळुरु साऊथचे पोलीस अधीक्षक, श्रीनिवास गौडा आर. यांनी आम्हाला सांगितलं की, आरोपींना भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम १७३ (निवडणूक लाच), 352 (शांतता भंग करणे, इतर गुन्ह्यासाठी जाणीवपूर्वक अपमानित करणे) तसंच लाचलुचपत प्रतिबंध कायद्याच्या कलम ७ नुसार अटक करण्यात आली आहे.

काँग्रेसच्या आमदारांना लाच देण्याचा प्रयत्न

ओडिशामध्ये काँग्रेस विधीमंडळ पार्टीचे उपनेते अशोक कुमार दास यांनी निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी त्यांच्या आमदारांचं अपहरण करण्यासाठी भाजपच्या-कट कारस्थनाच्या योजनेबाबत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हे अटकसत्र राबवण्यात आलं. एका पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, चारही आरोपी बंगळुरुच्या वंडर ला रिसॉर्टमध्ये घुसण्यात यशस्वी ठरले त्यानंतर त्यांनी इथं ठेवण्यात आलेल्या ओडिशा काँग्रेसच्या आमदारांना लाच देण्याचा प्रयत्न केला. या रिसॉर्टमध्ये पहिल्यांदाच निवडून आलेल्या काँग्रेसच्या ८ आमदारांना ठेवण्यात आलं आहे. कारण त्यांना क्रॉस वोटिंग करण्याच्या धोक्यापासून वाचवलं जावं. या आमदारांची राजन एक्का, अशोक दास, अप्पाला कुमार स्वामी, मंगू किलो, पवित्र सौंथा, नीलमाधव हिक्का, प्रफुल्ल प्रधान आणि सत्यजीत गोमोंगो अशी नाव आहेत.

आज पार पडलं मतदान

ओडिशाच्या चार राज्यसभा जागांसाठी आज निवडणूक पार पडली. यासाठी भाजपनं तीन उमेदवार दिले आहेत तर बिजू जनता दलाच्या एका उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. दुसरीकडं बिजेडीनं काँग्रेसच्यासह हात मिळवून प्रसिद्ध युरोलॉजिस्ट डॉ. दत्तेश्वर होता यांनाही मैदानात उतरवण्यात आलं आहे. जे ओडिशा मेडिकल युनिव्हर्सिटीचे माजी संलाचकही राहिले आहेत. १४७ सदस्य असलेल्या ओडिशाच्या विधीमंडळात प्रत्येक उमेदवाराला जिंकण्यासाठी ३० मतांची गरज होती. त्यातच विरोधक बिजेडीजवळ ४८ आमदार आणि काँग्रेसजवळ १४ आमदार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT