Teachers Action : दहावी-बारावी परीक्षेत कॉपी पुरवणं पडलं महागात! चक्क 103 शिक्षकांवर एकाच वेळी कारवाईची कुऱ्हाड

Action Against Teachers: दहावी-बारावी एसएससी-एचएससी बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्यांना कॉपी पुरवल्याच्या आरोपावरून महाराष्ट्रात 103 शिक्षकांवर कारवाई करण्यात आली आहे. शिक्षण विभागाने परीक्षा गैरप्रकारांवर मोठी कारवाई केली.
Action Against Teachers
Action Against TeachersSarkarnama
Published on
Updated on

दहावी आणि बारावीच्या परिक्षांमध्ये होणाऱ्या कॉपीच्या प्रकारांवर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा मोठी आणि कठोर कारवाई केली आहे. परिक्षेदरम्यान सामूहिक कॉपी झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर मंडळाने तब्बल 103 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई केली आहे. या मोठ्या निर्णयामुळे राज्यातील शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

परीक्षा केंद्रावर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी मंडळाने यंदा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था अधिक कडक केली होती. या कॅमेऱ्यांच्या मदतीने अनेक केंद्रांवरील संशयास्पद हालचालींची तपासणी करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजची सखोल पाहणी केल्यानंतर काही ठिकाणी विद्यार्थ्यांना सर्रास कॉपी करण्यात मदत केली जात असल्याचे स्पष्ट झाले. या पुराव्यांच्या आधारे मंडळाने संबंधित शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे.

Action Against Teachers
Nashik Kumbh Mela : साधूंच्या परोक्ष मुख्यमंत्र्यांना कुंभमेळ्याचे निमंत्रण ; बैठकीलाही बोलावलं नाही, वादाची ठिणगी पेटली..

तपासात दोषी आढळलेल्या 103 शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय काही ठिकाणी परीक्षेची गोपनीयता भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवर आणखी कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.

बीड जिल्ह्यातील चौसाळा येथील कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात 10 फेब्रुवारी रोजी पहिल्याच पेपरमध्ये सामूहिक कॉपीचा प्रकार उघड झाला. या प्रकरणात 17 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच यशवंत विद्यालयाचे केंद्र संचालक अनिल राऊत यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली. तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील जैतापूर येथील राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालयात सीसीटीव्हीमध्ये पर्यवेक्षकच विद्यार्थ्यांना कॉपीसाठी मदत करताना दिसले. या प्रकरणी 24 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून 21 जणांना निलंबित करण्यात आले आहे.

गडचिरोली जिल्ह्यातही हायटेक पद्धतीने कॉपी करण्याचा प्रकार उघड झाला. ब्रोमनवार विद्यालयात राज्यशास्त्राच्या पेपरमध्ये मायक्रोनोट्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने तयार केलेले साहित्य वापरून सामूहिक कॉपी करण्यात आली. या प्रकरणी 3 शिक्षक आणि 1 शिपायावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील सलगरा केंद्रावर 9 विद्यार्थी गैरप्रकार करताना पकडले गेले. त्यापैकी 6 विद्यार्थ्यांकडे मोबाईल आढळले. या प्रकरणात 3 शिक्षकांना निलंबित करण्यात आले असून आणखी 3 कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

Action Against Teachers
Rat Bites ICU Patient : धक्कादायक! आयसीयुतील रुग्णाचा हात उंदराने कुरतडला, सरकारी रुग्णालयातील धक्कादायक घटना

वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक गैरप्रकार उघडकीस आले. जुमडा फाटा येथील श्री मैनागिरी महाराज कनिष्ठ महाविद्यालयात 16 फेब्रुवारी रोजी भौतिकशास्त्राच्या पेपरमध्ये तब्बल 581 विद्यार्थ्यांनी सामूहिक कॉपी केल्याचे समोर आले. तसेच शेंदूर्जना आढाव येथे 3 कर्मचारी, रुईगोस्ता येथे 5 कर्मचारी, मांडवा येथे 7 कर्मचारी, रिसोड येथे 3 कर्मचारी आणि लेहणी केंद्रावर 2 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात मंठा येथे इंग्रजीच्या पेपरमध्ये कॉपीसाठी मदत केल्याप्रकरणी 5 पर्यवेक्षकांना घरी पाठवण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे तर डमी विद्यार्थी परीक्षा देताना आढळला. या प्रकरणी तोतया विद्यार्थ्यासह केंद्रप्रमुख आणि पर्यवेक्षिकेवर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com