

Mumbai News : इराण-इस्त्रायल-अमेरिका युद्धाचा जगातील अनेक देशांसह भारतालाही मोठा फटका बसला आहे. या युद्धजन्य परिस्थितीमुळे देशभरात पेट्रोल,डिझेलसह एलपीजी गॅसचा पुरवठा अडचणीत आला आहे. यामुळे बाजारपेठेत घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाल्यामुळे राज्यातील नागरिकांना लांबच्या लांब रांगेत उभे राहून मनस्ताप सहन करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर आता सरकारनं गॅसच्या तुटवड्यावर सरकारनं 'रामबाण' उपाय शोधून काढला आहे.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सोमवारी (ता.16) याबाबतचं निवेदन विधिमंडळाच्या अधिवेशनात सादर केले. राज्यातील विविध भागांत गॅस तुटवड्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. कुटुंब, व्यावसायिक,रुग्णालये, धार्मिक स्थळं गॅस तटुवड्यामुळे संकटात सापडली आहे. या बाजारपेठेत निर्माण झालेल्या गॅस टंचाईवर मात करण्यासाठी केरोसिन नागरिकांना वापरासाठी उपलब्ध करून देण्याविषयी राज्य सरकार अत्यंत विचाराधीन असल्याची माहिती समोर येत आहे.
राज्य सरकार आता एलपीजी तुटवड्यावर अॅक्शन मोडवर आले असून पर्यायी मार्ग म्हणून बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर केरोसिन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ज्यांना वेळेवर सिलेंडर मिळत नसेल ,त्यांना केरोसिनचं वाटप केले जाणार आहे.
छगन भुजबळ विधिमंडळाच्या अधिवेशनात म्हणाले, राज्यात केरोसिनचा भरपूर साठा असून उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना केरोसिन द्यायची गरज नाही, असे आदेश न्यायालयाने दिले होते. पण आता आम्ही सगळ्यांना केरोसिन उपलब्ध करुन देण्याबाबत कोर्टाला माहिती दिली आहे. त्यानुसार केरोसिन डिलर्सही केरोसिन देऊ शकतात. पण न्यायालयाच्या आदेशानंतर मध्यंतरीच्या काळात केरोसिन पूर्णपणे बंद झाल्यामुळे त्याच्या डिलर्सची साखळी तुटली होती.
यावेळी भुजबळांनी आपली बीपीसीएल, एचपीसीएल आणि आयओसीएल या पेट्रोलियम कंपन्यांच्या प्रतिनिधींशी सकाळीच चर्चा झाल्याची माहिती सभागृहात दिली. तसेच याचवेळी त्यांनी एलपीजी गॅस पुरवठा सुरळीत होईपर्यंत बीपीसीएल, एचपीसीएल आणि आयओसीएल या कंपन्यांच्या पंपांवर केरोसिन उपलब्ध करुन दिले जाणार आहे. जेणेकरुन केरोसिनमध्ये भेसळ होणार नसल्याचंही भुजबळ यांनी सांगितलं.
तसेच बीपीसीएल, एचपीसीएल आणि आयओसीएल या पेट्रोलियम कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून आपल्याला राज्यातील घरगुती गॅसचं दैनंदिन उत्पादन 9000 वरुन 11000 मेट्रिक टनपर्यंत वाढवल्याची माहिती देण्यात आल्याचंही भुजबळ म्हणाले. एलपीजी उत्पादनातील सगळ्या अडचणी दूर करण्याचे काम सुरु असल्याचे या कंपन्यांकडून सांगण्यात आले.
बीपीसीएल, एचपीसीएल आणि आयओसीएल या कंपन्यांच्या पंपांवर केरोसिन उपलब्ध करुन देऊ. जेणेकरुन केरोसिनमध्ये भेसळ होणार नाही. आम्ही केंद्र सरकारच्या सातत्याने संपर्कात आहोत. एलपीजी आणि पेट्रोलियम पदार्थ मिळवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. हा प्रश्न हळूहळू सुटेल, असेही छगन भुजबळ यांनी सांगितले.
मी बीपीसीएल, एचपीसीएल आणि आयओसीएल या पेट्रोलियम कंपन्यांच्या प्रतिनिधींशी सकाळी चर्चा केली. त्यांनी राज्यातील घरगुती गॅसचे दैनंदिन उत्पादन 9000 वरुन 11000 मेट्रिक टनपर्यंत वाढवल्याचे सांगितले. तसेच एलपीजी उत्पादनातील सगळ्या अडचणी दूर करण्याचं काम सुरु असून सध्या घरगुती गॅसच्या उत्पादनाला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आल्याचंही भुजबळ यांनी म्हटलं.
यानंतर गॅस उरलाच तर रुग्णालये, शैक्षणिक संस्था,वृद्धाश्रम, स्मशानभूमी यांना एलपीजी उत्पादनात 100 टक्के प्राधान्य दिले जाईल. औषध उद्योगासाठी आणि संरक्षण क्षेत्रातील उपहारगृहांना एलपीजी वितरणात 50 टक्के प्राधान्य आहे, असल्याचंही छगन भुजबळ यांनी सांगितले.
याचदरम्यान, मंत्री छगन भुजबळांनी एलपीजीचा विषय हा केंद्र सरकारचा असल्याचं स्पष्ट केलं. एलपीजीचा मुबलक साठा उपलब्ध असल्याची माहितीही सरकारकडून देण्यात आली आहे. तसेच प्रशासनाकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत बाराशेहून अधिक गॅस सिलेंडर आणि 33 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचंही भुजबळ यांनी नमूद केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.