Shevgaon Gang War : मुख्यमंत्र्यांनी डाॅक्टरेट घेतली, त्याचवेळी जिल्ह्यात 'ठाॅय-ठाॅय'! टोळीयुद्धात सहा गोळ्या झाडल्या, एक गंभीर जखमी

Notorious criminal Suresh Kapse allegedly opened fire during a gang rivalry in Bodhegaon of Shevgaon taluka, leaving Ganesh Kapse seriously injured : शेवगावच्या बोधेगाव इथं 'पुर्ववैमनस्यातून' दोन गटात युद्धाचा भडका होऊन, झालेल्या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला आहे.
Shevgaon Gang War
Shevgaon Gang WarSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar crime news : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्यावतीनं 'मानद डाॅक्टरेट पदवी' देत काल सन्मान करण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस या कार्यक्रमासाठी राहुरी दाखल होण्यापूर्वीच शेवगावमधल्या बोधेगाव इथं टोळीयुद्धाचा भडका उडाला होता.

कुख्यात गुंड सुरेश कापसे ऊर्फ पिन्या आणि गणेश कापसे या दोघांच्या गँगमध्ये हा भडका उडाला. या टोळीयुद्धात गोळीबार झाला. गणेश कापसे याच्या दाव्यानुसार तब्बल सहा गोळ्या झाडल्या. यात दोन गोळ्या लागल्याने गणेश कापसे हा गंभीर जखमी झाला आहे.

शेवगाव तालुक्यातील बोधेगाव इथं रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास दोन गटांत टोळीयुद्ध भडकले. या टोळीयुद्धात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या टोळीयुद्धात (Crime) गोळीबार झाल्याने आजही शेवगाव बोधेगावमध्ये तणावाचं वातावरण आहे.

पोलिस (Police) कर्मचारी कोलते यांच्या खुनातून निर्दोष सुटलेला सुरेश कापसे उर्फ पिनू (रा. अंतरवाली बुद्रुक, ता. शेवगाव) आणि गणेश कापसे यांच्यात हे टोळीयुद्ध भडकले. हल्ल्यात गणेश कापसे याच्या पायावर गोळ्या झाडण्यात आल्या. गंभीर जखमी झालेला गणेश कापसे याला अहिल्यानगरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

Shevgaon Gang War
Radhakrishna Vikhe constituency crime : ‘टेंडर’वरून थेट पिस्तुल! मंत्री विखेंच्या मतदारसंघात समर्थक नगरसेवकाला धमकी; राजकीय वर्तुळात खळबळ

पोलिसांकडील सूत्रांनुसार बोधेगाव इथल्या सरकारी विश्रामगृह परिसरात शेवगाव-गेवराई राज्यमार्गालगत पिनू कापसे आणि जिल्हा परिषदेच माजी सदस्य नितीन काकडे यांचे समर्थक गणेश कापसे यांच्यात वाद झाला. या वादाला 'पुर्ववैमनस्याची' किनार आहे. दोघे समोरा-समोर येताच, क्षणांत टोळीयुद्धाचा भडका उडाला. शस्त्रांचा वापर झाला.

Shevgaon Gang War
Advocate death threat case : एक खून केलाय… दुसरा करायला वेळ लागणार नाही! वकिलाच्या डोक्याला गावठी पिस्तूल लावून पक्षकाराचा थरार

फायरिंग झाल्यादा दावा....

टोळीयुद्धात तब्बल सहा गोळ्या लागोपाठ झाडण्यात आला. यात गणेश कापसे याच्या पायाला दोन गोळ्या लागल्यात. पोलिसांच्या दाव्यानुसार गोळीबार झाल्याची माहिती नाही. पण हे टोळीयुद्ध होते अन् त्यात गोळीबार झाला.

पोलिसांकडून घटनेची नोंद

या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक नीरज राजगुरू, शेवगावचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी घठनास्थळाला भेट दिली. या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री जिल्ह्यात असतानाच...

दरम्यान, शेवगावमध्ये हे टोळीयुद्ध भडकण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहिल्यानगर जिल्ह्यात होते. राहुरी इथं महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. तिथं त्यांना डाॅक्टरेट पदवी देत सन्मानित करण्यात आलं. मुख्यमंत्री जिल्ह्यात असतानाच गुन्हेगारी उफाळतेय, याचे अहिल्यानगर पोलिसांना कायदा-सु्व्यवस्थेबाबत एकप्रकारे आव्हानच आहे. अलीकडच्या काळात जिल्ह्यात अवैध मार्गाने शस्त्रांचा वापर, गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com