Pm Narendra Modi, Amit Shah Sarkarnama
देश

BJP Issues whip to MP : मोठी बातमी ! भाजपच्या सर्व खासदारांना व्हीप जारी; नेमकं कारण काय ?

Ganesh Thombare

Delhi News: राज्यसभेतील सर्व खासदारांना भाजपने व्हीप काढला असून, शनिवारी (ता.10 फेब्रुवारी) सभागृहात उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासंदर्भात राज्यसभेचे खासदार लक्ष्मीकांत वाजपेयी यांनी पत्र जारी केले आहे. मात्र, भाजपने अचानक काढलेल्या या व्हीपमुळे चर्चांना उधाण आले असून, अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (BJP Issues whip to MP)

राज्यसभेत 10 फेब्रुवारीला काही महत्त्वाची विधेयकं मंजूर करण्यात येणार आहेत. तसेच काही महत्त्वाच्या विधेयकांवर सभागृहात चर्चा देखील होणार आहे. यासंदर्भातील माहिती लक्ष्मीकांत वाजपेयी यांनी जारी केलेल्या पत्रात देण्यात आली आहे, पण कोणत्या विधेयकावर चर्चा होणार आणि कोणते विधेयकं मंजूर केले जाणार ? याबाबतची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही.

अधिवेशनाचा कालावधी वाढवला...

सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, हे अधिवेशन 9 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार होते. पण आता अधिवेशनाचा कालावधी एका दिवसांसाठी वाढवण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे 9 फेब्रुवारीऐवजी हे अधिवेशन 10 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी भाजपने लोकसभा आणि राज्यसभेतील सर्व सदस्यांना शनिवारी सभागृहात उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे कोणते मोठे निर्णय शनिवारी सभागृहात होतात, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT