Ram Rahim Parole  Sarkarnama
देश

Ram Rahim Parole : बलात्कारप्रकरणी 20 वर्षांची शिक्षा; चार वर्षांत 9 वेळा पॅरोल, आता पुन्हा 50 दिवस जेलबाहेर

Chetan Zadpe

Hariyana News : डेरा सच्चा सौदाप्रमुख गुरमीत राम रहीम सिंगला पुन्हा एकदा पॅरोल मिळाला आहे. बलात्कार आणि हत्या प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरलेला गुरमीत राम रहीम सिंगला पुन्हा एकदा पॅरोल मंजूर झाला आहे. राम रहीम याला बलात्कार व हत्येप्रकरणी 20 वर्षांची शिक्षा झाली आहे. मात्र त्याची पुन्हा-पुन्हा पॅरोलवर सुटका होत आहे. (Latest Marathi News)

यावळी तो तब्बल 50 दिवस जेलच्या बाहेर राहणार आहे. गेल्या चार वर्षांत राम रहीमची तुरुंगातून बाहेर येण्याची ही 9 वी वेळ आहे. हरियाना सरकारने शुक्रवारी दोषी राम रहीमला नव्याने पॅरोल मंजूर केला आहे. यापूर्वी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये राम रहीमची 21 दिवसांच्या पॅरोलवर तुरुंगातून सुटका झाली होती. (Latest Marathi News)

डेराप्रमुख राम रहीम सिंग हा दोन महिलांवर बलात्कार आणि त्यांच्या हत्येप्रकरणी शिक्षा भोगत आहे. तो हरियानाच्या रोहतक जिल्ह्यातील सुनारिया तुरुंगात बंद आहे. राम रहीम सिंग पुन्हा एकदा पॅरोलवर तुरुंगातून बाहेर येणार आहे. याआधी त्याला गेल्या वर्षी जानेवारीत 40 दिवसांसाठी पॅरोल देण्यात आला होता. शिवाय, ऑक्टोबर 2022 मध्ये 40 दिवसांसाठी पॅरोल मंजूर करण्यात आला होता.

ऑक्टोबर 2022 मध्ये पॅरोल मिळण्यापूर्वी राम रहीम जून 2021 मध्ये दुसऱ्यांदा एक महिन्याच्या पॅरोलवर बाहेर आला होता. डेरा मॅनेजर रणजित सिंग यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणीही डेरा सच्चा सौदाप्रमुख राम रहीम सिंग याच्यासह चार जणांनाही दोषी ठरवण्यात आले आहे. तसेच 16 वर्षांपूर्वी एका पत्रकाराच्या हत्येप्रकरणीही राम रहीम आणि इतर तिघांना 2019 मध्ये दोषी ठरवण्यात आले होते.

(Edited By - Chetan Zadpe)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT