Delhi CM Rekha Gupta News : रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यापासून आम आदमी पार्टी आणि भाजपमध्ये शाब्दिक युद्ध उफाळलं आहे. आम आदमी पार्टीने रेखा गुप्ता यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर महिला सुरेक्षेवरून प्रश्न विचारला होता. यावर दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी महिला सुरक्षा आणि सरकारवर विरोधकांनी उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना सडेतोड उत्तर दिले आहे.
त्यांनी मागील प्रशासनावर दिल्लीच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्याचा आणि भ्रष्टाचारात गुंतल्याचा आरोप केला. एवढच नाहीतर पहिल्याच दिवशी भाजप सरकारने केजरीवालांना जोरदार झटका दिला आणि त्यांच्या वैयक्तिक कर्मचाऱ्यांच्या सेवा बंद केल्या. एवढच नाहीतर मुख्यमंत्र्यांनी आम आदमी पार्टीत(AAP) मोठ्या फुटीचा इशाराही दिला.
मुख्यमंत्री रेखा गुप्ता(Rekha Gupta) यांनी पदभार सांभाळल्याच्या पहिल्याच दिवशीपासूनच त्या अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या वैयक्तिक कर्मचाऱ्यांची सेवाही समाप्त केली आहे. त्यांनी म्हटले की माजी सरकारने ज्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. त्यांना दुसऱ्या जागी नियुक्ती दिली जाईल. त्यांना तत्काळ आपल्या मूळ विभागात रिपोर्ट करण्यास सांगितले आहे. अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दुसऱ्या बोर्ड कॉर्पोरेशनमध्ये पाठवले गेले होते.
असेही सांगितले जात आहे की, आठवडाभरापूर्वीच सर्व विभागांना माजी सरकारकडून कॉन्ट्रॅक्ट आणि वैयक्तिक स्टॉफची माहिती मागवली गेली होती, त्यांना त्यांच्या मूळ विभागात परत जाण्यास सांगण्यात आले होते.
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आम आमदी पार्टीच्या आरोपांना उत्तर देत म्हटले की, कृपया तुमच्या पक्षाची आणि स्वत:ची काळजी घ्या. तिथे बराच गोंधळ सुरू आहे आणि अनेकजण निसटण्याच्या तयारीत आहेत. दिल्ली विधासभा(Vidhansabha) निवडणुकीत आम आदमी पार्टीचे 22 आमदार विजयी होवू शकले. जर अशावेळी पक्षात कोणती फूट पडते किंवा काही गोंधळ होतो, तर तुमच्या भविष्यावर संकट निर्माण होवू शकतं.
तसेच मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितले की, ज्यांनी दिल्लीतील जनतेचा विश्वासघात केला, केवळ घोषणा दिल्या, काम केले नाही आणि आज तेच एका दिवासांत आमच्याकडे बोट दाखवत आहेत. त्या म्हणाल्या हे आम्ही आहोत की ज्यांनी पहिल्याच दिवशी शपथ घेताच कॅबिनेटची बैठक घेतली आणि त्या मिटींगमध्ये आयुष्मान योजनेस दिल्लीत लागू केले. ही योजना आम आदमी पार्टीच्या सरकारने अडवली होती. ज्यामुळे लाखो लोकांचे अधिकारी दाबले गेले होते. त्यांनी सांगितले की दहा लाखांच्या योजनेचा लाभ आम्ही पहिल्याच दिवशी आपल्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये दिल्लीला दिला आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.