Shama Mohammed and Rohit Sharma Sarkarnama
देश

Shama Mohammed salute Rohit Sharma : ..अन् आधी नावं ठेवणाऱ्या शमा मोहम्मद यांनी अखेर रोहित शर्माला केला सलाम!

Shama Mohammed on Indian Cricket Team : जाणून घ्या, भारतीय संघाने चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्यानंतर नेमकं म्हणाल्या आहेत शमा मोहम्मद?

Mayur Ratnaparkhe

Shama Mohammed latest news : चॅम्पियन ट्रॉफी 2025च्या अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय क्रिकेट संघाने न्यूझिलंडचा चार गडी राखून पराभव केला आणि याचबरोबर चॅम्पियन ट्रॉफी देखील पटकावली. भारतीय संघाच्या या यशामुळे संपूर्ण देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे. प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुलली आहे. सर्वजण विजेत्या भारतीय संघाच्या कामगिरीचे कौतुक करत आहे.

चॅम्पियन ट्रॉफी विजेत्या टीम इंडियावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यामध्ये सर्वसामान्यापासून ते अगदी पंतप्रधान मोदींपर्यंत(PM Modi) सर्वांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे. त्यात आता काही दिवसांआधीच भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार रोहित शर्मा याला फिटनेसवरून नावं ठेवणाऱ्या आणि सर्वात अपयशी कॅप्टन असं म्हणणाऱ्या काँग्रेसच्या नेत्या शमा मोहम्मद यांनीही अखेर रोहित शर्माला सलाम केला आहे.

शमा मोहम्मद(Shama Mohammed) यांनी भारतीय संघाला शुभेच्छा देण्यासाठी एक्सवर एक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्यांनी रोहित शर्माला सलाम करत, त्याचे कौतुकही केल्याचे दिसत आहे. शमा मोहम्मद यांनी त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, टीम इंडियाचे चॅम्पियन ट्रॉफी 2025 जिंकल्याबद्दल आणि त्यांच्या शानदार प्रदर्शनाबद्दल अभिनंदन. कॅप्टन रोहित शर्माला सलाम, ज्याने शानदार 76 धाव बनवून विजयाचा पाया रचला. श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी महत्त्वपूर्ण खेळी करून भारताल विजय मिळवून दिला. एक अविस्मरणीय विजय.

खरंतर शमा मोहम्मद यांनी याआधी जेव्हा रोहित शर्माच्या फिटेनवरून त्याच्यावर टीका केली होती. तेव्हा शमा मोहम्मद यांना क्रिकेट चाहत्यांसह सर्वांच्याच रोषाला सामोरे जावे लागले होते. त्यांचा पक्ष काँग्रेसनेही त्यांची बाजू घेतली नव्हती अन् कानउघडणीही केली होती.

यापूर्वीचं शमा मोहम्मद यांचं वादग्रस्त विधान काय..?

काँग्रेसच्या(Congress) राष्ट्रीय प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी रोहितच्या शरीरावर टिप्पणी केली होती. वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी एक्सवर लिहिलेला मजकूर हटवला आहे. शमा यांनी रोहित हा जाड खेळाडू असल्याचे म्हटले होते. तसेच भारताचा आतापर्यंतचा सर्वात निराशाजनक कॅप्टन असल्याचे विधानही त्यांनी केले होते. त्त्याला वजन कमी करण्याची गरज असल्याचा सल्लाही त्यांनी दिला होता. शमा यांच्या या टिप्पणीनंतर मोठा वाद निर्माण झाला होता.

त्यानंतर शमा यांनी आपली पोस्ट डिलिट करत त्यांच्या विधानाबाबत खुलासाही केला होता.त्या म्हणाल्या होत्या,आपण खेळाडूच्या फिटनेसविषयी ट्विट केले होते. त्यामध्ये शारिरीक व्यंगावर बोलण्याचा हेतू नव्हता.खेळाडूनं फिट असायला हवं, असं मला वाटते. त्याचं वजन थोडं जास्त आहे, असं मला वाटलं. म्हणून त्याविषयी मी ट्विट केलं.मात्र, त्यावरून विनाकारण वाद निर्माण करण्यात आला.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT