Andhra Pradesh Politics : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना स्किल डेव्हलपमेंट घोटाळ्याप्रकरणी 9 सप्टेंबरला अटक झाली होती. तब्बल 3,300 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप चंद्राबाबू नायडू यांच्यावर होता. मात्र, आता आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने सोमवारी नायडू यांना नियमित जामीन मंजूर केला. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
चंद्राबाबू नायडू यांना न्यायालयाने 31 ऑक्टोबरला चार आठवड्यांचा अंतरिम वैद्यकीय जामिन मंजूर केला होता. पण आता याचे पूर्ण जामिनात रूपांतर करत न्यायालयाने त्यांना नियमित जामिन मंजूर केला आहे. ज्यावेळी चंद्राबाबू नायडूंना या अटक झाली होती, त्यावेळी आंध्र प्रदेशमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या होत्या, त्यांच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी आंदोलनं केली होती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
चंद्राबाबू नायडू यांच्यावर तब्बल सरकारी तिजोरीतील तब्बल 3,300 कोटी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप आहे. याच प्रकरणात आंध्र प्रदेश पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने तपास सुरू केला होता. त्यानंतर चंद्राबाबू नायडूंना अटक करण्यात आली होती. यानंतर ते काही दिवस कारागृहात होते.
पण काही दिवसांपूर्वीच आरोग्याच्या कारणास्तव त्यांना चार आठवड्यांसाठी अंतरिम वैद्यकीय जामिन मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर त्यांची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर आता त्यांना आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला.
दरम्यान, स्किल डेव्हलपमेंट घोटाळ्याप्रकरणी चंद्राबाबू नायडू यांनी अटक झाल्यानंतर उच्च न्यायालयात धाव घेत त्यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, उच्च न्यायालयाने गुन्हा रद्द करण्यास नकार दिला होता.
Edited by - Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.