Chandrababu Naidu : चंद्राबाबू नायडू यांना दुहेरी झटका; गुन्हा रद्द करण्यास उच्च न्यायालयाचा नकार

High Court Dismissed Chandrababu Naidu Petition : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना दुहेरी झटका बसला
Chandrababu Naidu
Chandrababu NaiduSarkarnama
Published on
Updated on

Andhra Pradesh : आंध्र प्रदेशच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी सुरु असून आता आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना दुहेरी झटका बसला आहे. स्किल डेव्हलपमेंट घोटाळ्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध दाखल झालेला गुन्हा रद्द करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. तर दुसरीकडे अँटी करप्शन ब्युरो कोर्टाने त्यांना जामीन देण्यास नकार देत 24 सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे.

चंद्राबाबू नायडू यांना स्किल डेव्हलपमेंट घोटाळ्याप्रकरणी 'सीआयडी'कडून 9 सप्टेंबरला अटक करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची कोठडी सुनावली होती. याच काळात चंद्राबाबू नायडू यांनी उच्च न्यायालयात धाव घेत त्यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, उच्च न्यायालयाने गुन्हा रद्द करण्यास नकार दिला आहे.

Chandrababu Naidu
Andhra Pradesh Politics : चंद्राबाबू नायडूंच्या अटकेने राजकारण तापलं : रेड्डी सरकारच्या अडचणी वाढल्या

चंद्राबाबू नायडू यांच्यावर तब्बल सरकारी तिजोरीतील 300 कोटी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप आहे. याच प्रकरणात सध्या चंद्राबाबू नायडू हे कारागृहात आहेत. आता तसेच अँटी करप्शन ब्युरो कोर्टाने 24 सप्टेंबरपर्यंत कोठडी वाढवली आहे. त्यामुळे चंद्राबाबू नायडू यांना दुहेरी झटका बसला आहे.

दरम्यान, चंद्राबाबू नायडू यांच्या अटकेच्या निषेधार्थ टीडीपीचे कार्यकर्ते आंध्र प्रदेशात निदर्शने करत आहेत. त्यामुळे आंध्र प्रदेशात सध्या राजकारण चांगलच तापलं आहे. चंद्राबाबू नायडू यांच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर आता चंद्राबाबू नायडू पुढे काय भूमिका घेतात ते पाहणे महत्वाचे असणार आहे.

Edited by - Ganesh Thombare

Chandrababu Naidu
Chandrababu Naidu Arrested: चंद्राबाबू नायडूंची हायकोर्टात धाव; बेल की पुन्हा जेल ? बुधवारी होणार फैसला

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com