Eknath Shinde-Devendra Fadnavis Sarkarnama
देश

Maharashtra Government: सनदी अधिकाऱ्यांबाबत शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ; शेअर मार्केट गुंतवणुकीची..

Stock Market Investments Civil Servants: स्टाँक, शेअर्स व अन्य गुंतवणुकीतून सट्टेबाजी करण्यास बंदी करण्यात आली आहे

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Government Decision: शेअर मार्केटमध्ये केलेल्या गुंतवणुकीबाबत आता सनदी अधिकाऱ्यांनी माहिती देणे बंधनकारक झाले आहे.

याबाबत त्यांना याबाबतची माहिती आता लपविता येणार नाही. सनदी अधिकाऱ्यांना शेअर मार्केटमधील गुंतवणुकीची माहिती यापुढे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिंदे-फडणवीस सरकारने याबाबतचा निर्णय घेतला आहे.

याबाबत सरकारने बुधवारी एक आदेश जारी केला आहे. सनदी अधिकाऱ्यांना स्टाँक, शेअर्स व अन्य गुंतवणुकीतून सट्टेबाजी करण्यास बंदी करण्यात आली आहे. मात्र स्टॉक ब्रोकर्स व इतर एजंटच्या माध्यमातून प्रासंगित गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली होती.

मात्र १ जानेवारी ते ३१ डिसेंबर कालावधीत स्टॉक, शेअर्स व इतर माध्यमांमधली गुंतवणूक जर शासकीय अधिकाऱ्यांच्या सहा महिन्याच्या मूळ वेतनाच्या अधिक होत असेल तर त्या व्यवहाराची माहिती सादर करावी लागेल. शेअरची वारंवार खरेदी विक्री करता येणार नाही.

दरवर्षी याबाबत माहिती जारी करणे बंधन कारक राहणार आहे. यामुळे बेहिशेबी मालमत्ता जमा करणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांवर यामुळे बंधन आले आहे. काही सनदी अधिकाऱ्यांनी शेअर मार्केट व अन्य माध्यमांतून बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचे आढळले आहे. त्यानंतर सरकारने याबाबतचा निर्णय घेतला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT