Ahmednagar News : अहमदनगर शहरातील अनेक विकासकामे निधी अभावी खोळंबून आहेत. कामांना मंजुरी मिळत असली तरी ठेकेदार कामे घ्यायला पुढे येत नाहीत. जुन्याच कामांची लाखोंची बिले महानगरपालिकेने तिजोरीतील खडखडाटा मुळे अदा केलेली नाहीत. त्यात आता न्यायालयाच्या प्रलंबित निर्णयाने निवडणुकांची शक्यता मावळली आहे. त्यामुळे प्रशासकीय राज येणार असताना ठेकेदार नवी कामे घेण्यास धजावत नाहीत. अशा बिकट परस्थितीत खासदार सुजय विखे यांनी शहरातील विविध प्रभागातील विकास कामांसाठी 1 कोटी 40 लाखांचा निधी बहाल करत कृपादृष्टी केली आहे. (Latest Marathi News)
खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून अहमदनगर शहरातील विकास कामांकरिता भरघोस निधी प्राप्त झाला आहे. शहरातील विविध प्रभागांमध्ये खासदार निधीतून 90 लक्ष आणि पर्यटन विकास मधून 50 लक्ष, असा एकूण 1 कोटी 40 लक्ष रुपयांचा भरीव निधी विविध ठिकाणी सभामंडपाच्या बांधकामांसाठी मंजूर करून दिला आहे.
खासदार निधीतून प्रभाग क्र. 2 येथील वैष्णवी माता मंदिर, प्रभाग क्र. 7 मधील विजयनगर येथे मारुती मंदिर परिसर, प्रभाग क्र. 8 मध्ये दातरंगे मळा येथील पर्जन ईश्वर महादेव मंदिर परिसर, प्रभाग क्र. 5 मध्ये समता चौक येथील हनुमान मंदिर व महादेव मंदिर परिसर, प्रभाग क्र. 9 मध्ये सिद्धी बागेतील श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसर, प्रभाग क्र. 16 मध्ये शिवाजीनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, प्रभाग क्र. 16 मध्ये ओंकार नगर येथील हनुमान मंदिर, प्रभाग क्र. 16 मध्ये विश्वनराजे मराठा मंदिर, प्रभाग क्र. 17 मध्ये शास्त्रीनगर येथील श्री दत्त मंदिर, प्रभाग क्र. 17 मध्ये मोहिनीनगर येथील श्री गणपती मंदिर आदी ठिकाणी आणि पर्यटन विकास मधून प्रभाग क्र. 16 मध्ये बालाजी कॉलनी येथील श्री स्वामी समर्थ मंदिर, प्रभाग क्र. 16 मध्ये पाच गोडाऊन येथील दत्त मंदिर, प्रभाग क्र. 17 मध्ये एकता कॉलनी देवी रोड येथील गणपती मंदिर, प्रभाग क्र. 17 मध्ये मोहिनी नगर पाण्याची टाकी येथील हनुमान मंदिर, प्रभाग क्र. 17 मध्ये शास्त्रीनगर येथील हनुमान मंदिर आदी ठिकाणी सभामंडप बांधकाम करणेसाठी सदरील निधी मंजूर झाला आहे.
या एकूण निधीचे वाटप पाहता प्रभाग 16 आणि 17 मधील अनेक विकास कामांना मंजुर केल्याचे दिसत आहे. प्रभाग 16 आणीन17 मधील पाच-पाच विकास कामांना निधी दिला आहे. विशेष म्हणजे ही कामे देवी-देवतांच्या मंदिरांची आहेत. इतर प्रभागांचे काय असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होणार आहे. वास्तविक हा निधी खा.विखे यांच्या अखत्यारीत असल्याने त्यांनी तो वापरला आहे.
निधी मंजुरीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना सुजय विखे यांनी एक लोकप्रतिनिधी या नात्याने विविध विकासकामांसाठी सदैव कटिबध्द असून यापुढेही अशा अनेकविध कामांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्नशील भूमिका पार पाडेल असे सांगून नागरिकांचे आभार मानले आहेत.
कार्यक्रमास जिल्हा शहराध्यक्ष अभय आगरकर,नगर दक्षिण लोकसभा प्रमुख बाबासाहेब वाकळे, अहमदनगर विधानसभा निवडणूक प्रमुख भैया गंधे, युवा मोर्चाध्यक्ष मयूर बोचुघोळ ,महिला शहराध्यक्ष प्रिया जानवे, ओबीसी सेल अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, प्रदेश कार्यकारणी सदस्य विवेक नाईक व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.