Ahmednagar Politics : साईबाबा आज नाहीत, तर त्यांना विचारले असते; सुजय विखे असे का म्हणाले?

Sujay Vikhe Statement on Sai Baba Temple : नगर दक्षिणेत साईबाबा मंदिर बांधल्यास राजकीय नेते येतील, यावर भाजप खासदार डॉ. सुजय विखेंनी साईबाबांविषयी केलेले विधान सध्या चर्चेत आले आहे.
Sujay Vikhe News
Sujay Vikhe NewsSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : नगर जिल्ह्यात भाजपमध्ये दक्षिण-उत्तर वाद चांगलाच रंगत चालला आहे. राज्यात भाजप महायुती सत्तेत राधाकृष्ण विखे राज्याचे महसूल आणि नगरचे पालकमंत्री पद सांभाळत आहेत. त्यांचे पुत्र सुजय विखे हे नगर दक्षिणेत खासदार आहेत. मंत्री विखेंची राजकीय ताकद सर्वश्रुत आहे. मंत्रिपदावर विराजमान झाल्यापासून विखेंनी जिल्ह्यात कामाचा झपाटा लावलाय. यातून भाजपच्या केंद्रातील नेत्यांकडेदेखील त्यांची उठबस वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डीला दोनदा हजेरी लावली आहे. याशिवाय केंद्रातील अनेक मोठे राजकीय नेते आणि मंत्री शिर्डीकडे, म्हणजेच नगर उत्तरेकडे हजेरी लावत आहेत.

Sujay Vikhe News
Sujay Vikhe & Ram Shinde : विखेंनी शिंदेंचे केलेले गोड तोंड किती काळ टिकणार?

खासदार विखेंचे लोकप्रतिनिधी म्हणून कार्यक्षेत्र नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ आहे. तसेच नगर जिल्ह्याचे मुख्यालय जिल्हाधिकारी कार्यालय नगर दक्षिणेत आहे. असे असताना विखे पिता-पुत्र हे नगर उत्तरेकडे नेत्यांचे काम उत्तरेकडे घेत आहे. यावर नगर दक्षिणेतील भाजपच्या नेत्यांनी खदखद व्यक्त केली आहे. या खदखदीचा बांध आमदार प्रा. राम शिंदे यांनी पहिल्यांदा फोडला. यानंतर माजी आमदार शिवाजी कर्डिले, आमदार मोनिका राजळे यांच्यासह सर्वच भाजपच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावर टिप्पणीला सुरुवात केली. यानंतर विखे पिता-पुत्रांनी आगामी काळात केंद्रीय मंत्र्यांचे कार्यक्रम नगर दक्षिणमध्ये घेऊ असे सांगून वातावरण काहीसे शांत केले.

नगर जिल्हा नियोजन समितीची काल बैठक झाली. या बैठकीला खासदार सुजय विखे उपस्थित होते. नगर दक्षिण-उत्तरेतील वादावर बेलताना त्यांनी साईबाबांविषयी विधान केले. खासदार विखे म्हणाले, "उत्तर-दक्षिण हा विषय न करता आपण लोकप्रतिनिधींना विनंती करत असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नगरला यावे, अशी विनंती केली होती. परंतु विमानतळ नाही. शिर्डीला विमानतळाबरोबर इतर गोष्टी सोयीस्कर वाटल्याने पंतप्रधानांनी शिर्डीला प्राधान्य दिले". साईबाबांनादेखील जुन्या काळी विनंती केली होती की, नगरमध्ये स्थायिक व्हावे. परंतु त्यांनी शिर्डीची निवड केली. त्या-त्या व्यक्तींनी त्या-त्या वेळी जी निवड त्याचा आपण काय अर्थ काढायचा. परंतु भविष्यात नगर दक्षिणमध्ये मोठ्या राजकीय नेत्यांना बोलावण्याचा प्रयत्न राहील, असे खासदार विखे यांनी सांगितले.

साईबाबा मंदिर आमच्याकडे (नगर दक्षिण) बांधा म्हणजे, राजकीय नेते येतील. यावर खासदार विखे म्हणाले, "साईबाबा आज नाहीत. नाहीतर त्यांना विचारले असते. परंतु मी त्या विषयावर उत्तर देऊ शकत नाही".

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कुणबी दाखले देण्यास सुरुवात

मराठा आरक्षणावर बोलताना खासदार सुजय विखे म्हणाले, "हा मुद्दा फार तांत्रिक आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. कोणताही मुद्दा अंधारात नाही. कुणबी दाखले ज्यांचे निघत आहेत. त्यांचे दाखले काढण्याचे काम महसूल यंत्रणेने सुरू केले आहे. पुढेही कुणबी असलेल्यांना दाखले मिळत राहतील. त्यामुळे मुख्यमंत्री यांनी सर्व पक्षाच्या नेत्यांसमोर भूमिका स्पष्ट केल्यानंतर यावर आता कोणीही बोलणे संयुक्तिक नाही".

Sujay Vikhe News
Maharashtra Politics : आमदार नीलेश लंकेंच्या दिवाळीच्या फराळावेळी राम शिंदेंनी फोडले फटाके!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com