Nagar Janata Darbar : नगर दक्षिणमध्ये प्रत्येक महिन्याला जनता दरबार; विखेंनी अधिकाऱ्यांना दिला होमवर्कचा सल्ला!

Radhakrishna Vikhe Patil : जनता दरबार संपल्यानंतर मंत्री विखे यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेवून संवाद साधला.
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar news : नगर दक्षिण भागातील नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी दर महिन्याला जनता दरबार घेवू. मला लोकांना भेटण्याचा कधीही कंटाळा नाही. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांनी सुध्दा होमवर्क करून यावा, असा सल्ला नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Radhakrishna Vikhe Patil
Sushma Andhare : '' शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांचे स्मृतिस्थळ बाटवले'' ; सुषमा अंधारेंचा घणाघात!

मंत्री राधाकृष्ण विखे यांनी आपल्या नगर शहरातील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जनसंपर्क कार्यालयात आज जनता दरबार घेतला. यावेळी त्यांनी नगर दक्षिणमधील नागरिकांचे प्रश्न जाणून घेतले. विविध प्रश्नाच्या बाबतीत त्यांनी संबधीत विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना करून तातडीने समस्या निकाली काढण्याबबात आदेशही दिले.

यावेळी जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, भाजपचे नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, प्रा.भानुदास बेरड, वसंत लोढा, महेंद्र गंधे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

आजच्या जनता दरबारामध्ये आलेल्या नागरिकांशी मंत्री विखे यांनी संवाद साधला. प्रत्येक तालुक्यातून आलेले कार्यकर्ते आणि नागरिकांची चौकशी करत त्यांनी प्रश्न सोडविण्यासाठी आश्वासित केले. जनता दरबार संपल्यानंतर मंत्री विखे यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेवून संवाद साधला.

Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe News : राज्यात भाजपचं नेतृत्व कोण करणार? मंत्री विखेंनी घेतलं 'या' नेत्याचं नाव

तालुका आणि जिल्हा स्तरावरील सर्व अधिकाऱ्यांनी सामान्य माणसाला न्याय देण्याच्या भूमिकेतून काम करण्याचे आवाहन करून जनता दरबार ही संकल्पना नगर दक्षिण भागात नवीन असली, तरी उतर नगरप्रमाणे दक्षिण भागात यामध्ये सात्तत्य ठेवून नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपले प्राधान्य असेल, असे मंत्री विखे यांनी सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com