Udhayanidhi Stalin  Sarkarnama
देश

Udhayanidhi Stalin News : उदयनिधी स्टॅलिन यांना सनातन धर्माचा अवमान करणं भोवलं; सुप्रीम कोर्टाचा दणका

Supreme Court ON Sanatan Dharma : भाजप नेत्यांसह अनेकांनी उदयनिधी यांच्यावर चौफेर टीका केली आहे.

Mangesh Mahale

New Delhi : सनातन धर्माची तुलना डेंगी आणि मलेरियाशी करणारे तामिळनाडूचे क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना सुप्रीम कोर्टाने दणका दिला आहे. सनातन धर्माचा अवमान केल्याप्रकरणी उदयनिधी यांना सुप्रीम कोर्टानं नोटीस बजावली आहे. तामीळनाडू सरकारलाही नोटीस बजावली आहे.

सनातन धर्माचा अवमान केल्याप्रकरणी उदयनिधी यांच्या विरोधात न्यायालयात विविध याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. सनातन धर्मावर टीका केल्यानंतर भाजप नेत्यांसह अनेकांनी उदयनिधी यांच्यावर चौफेर टीका केली आहे. सनातन धर्माचा अवमान केल्याप्रकरणी उदयनिधि आणि ए राजा यांच्या विरोधात आलेल्या याचिकांवरून न्यायालयाने नोटीस बजावली आहे.

खासदार थिरुमावलवन, खासदार सु वेंकटेशन, तामिळनाडुचे पोलिस महासंचालक, ग्रेटर चेन्नईचे पोलीस आयुक्त, केंद्रीय गृह मंत्रालय, मंत्री पीके शेखर बाबू, तामिळनाडु राज्य अल्पसंख्यक आयोगाचे अध्यक्ष पीटर अल्फोंस आणि अन्य काही जणांनाही न्यायालयाचे नोटीस पाठवली आहे.

“सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींचा विरोध करता येत नाही. त्या संपवल्याच पाहिजे. आपण डेंग्यू, मलेरिया किंवा करोनाचा विरोध करू शकत नाही. त्याला संपवलच पाहिजे. तसेच, सनातन धर्मालाही संपवायचं आहे,” असं विधान उदयनिधी स्टॅलिन यांनी केलं आहे.

नवीन संसद भवनाच्या उद्धघाटनाला राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांना मोदी सरकारने निमंत्रण दिले नाही, यावरून उदयनिधी यांनी याचा संबध सनातन धर्माशी जोडला आहे. "सगळ्यांनी नवीन संसद भवनाचा दौरा केला, मात्र राष्ट्रपतींना त्यांचे निमंत्रण दिले नाही. कारण त्या आदिवासी आणि विधवा असल्यामुळे त्यांना निमंत्रण दिले नाही, यालाच सनानत धर्म म्हणतात" असे उदयनिधी स्टॅलिन म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT