Rahul Gandhi News Sarkarnama
देश

Rahul Gandhi Defamation Case: राहुल गांधींना दिलासा नाहीच ; 'मोदी' बाबतची याचिका फेटाळली ; आता सुप्रीम कोर्टात..

Rahul Gandhi Plea Dismissed: या निर्णयाविरोधात राहुल गांधी यांना आता सुप्रीम कोर्टात धाव घ्यावी लागणार आहे.

सरकारनामा ब्यूरो

Surat Court Hearing: काँग्रेसचे नेते, माजी खासदार राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. "सर्व चोरांचे आडनाव मोदी का?" या विधानासाठी दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या खटल्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोषी ठरवण्यात आले आहे. गुजरातच्या सुरत सत्र न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

ही शिक्षा रद्द करण्यात यावी, अशी याचिका राहुल गांधी यांनी सुरत सत्र न्यायालयात दाखल केली होती. त्यांची ही याचिका फेटाळण्यात आली आहे. या निर्णयाविरोधात राहुल गांधी यांना आता सुप्रीम कोर्टात धाव घ्यावी लागणार आहे.

"सर्व चोरांचे आडनाव मोदी का?" या विधानासाठी दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या खटल्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोषी ठरवण्यात आले आहे. गुजरातच्या सुरत सत्र न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली आहे. राहुल गांधी यांना कोर्टातून तीस दिवसांचा जामीनही मिळाला आहे. (Political Breaking News)

ही शिक्षा स्थगित करावी, यासाठी राहुल गांधींनी सुरत सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली आहे. न्यायालयात केलेल्या अपिलमध्ये कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला स्थगिती द्यावी, अशी मागणी केली होती.

या प्रकरणात याचिकाकर्ते पुर्णेश मोदी यांना न्यायालयाने नोटीस बजावली होती. या प्रकरणावर पुर्णेश मोदी यांनी न्यायालयाला आपलं म्हणणं सादर केलं आहे. या मध्ये त्यांनी ही हार जीत ची लढाई नाही. ही समाजिक लढाई असल्याचं म्हटलं आहे.

कर्नाटकातील कोलार येथे १३ एप्रिल२०१९ रोजी एका निवडणूक सभेत राहुल गांधी म्हणाले की नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी हे आडनाव सारखे का आहे? सगळ्या चोरांची आडनाव मोदी का? राहुल गांधी यांच्या या वक्तव्याबाबत भाजपचे आमदार आणि माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी त्यांच्याविरोधात फौजदारी मानहानीचा गुन्हा दाखल केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT