Agnipath Latest Marathi News, Residence of Deputy CM Renu Devi attacked Sarkarnama
देश

उपमुख्यमंत्र्यांच्या घरावर हल्ला; अमित शहांनी घेतली आंदोलनाची दखल

अग्निपथ योजनेविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचं लोण आता दक्षिणेतही पोहचलं आहे.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : सैन्य भरतीच्या ‘अग्निपथ’ योजनेविरोधात बिहारमधून सुरू झालेल्या आंदोलनाचे लोण आता देशभर पसरू लागलं आहे. तसेच संतापलेल्या आंदोलकांकडून राजकीय नेत्यांच्या घरांना लक्ष्य केलं जात आहे. बिहारमध्ये शुक्रवारी उपमुख्यमंत्र्यांच्या घरावर हल्ला करण्यात आला. यामध्ये घराचं मोठं नुकसान झाल्याचा दावा केला जात आहे. (Agneepath Recruitment Scheme)

घोषणेनंतर सलग तिसऱ्या तिसऱ्या बिहारसह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, हरयाणा, दिल्ली या राज्यांमध्ये युवक रस्त्यावर आले आहे. हे लोण दक्षिणेत पोहचले असून तेलंगणा राज्यात सिंकदराबादमध्ये हिंसाचार सुरू आहे. आंदोलकांनी एक रेल्वे पेटवून दिली आहे. बिहारसह उत्तर प्रदेशातही रेल्वेगाड्या व वाहनांना लक्ष्य केलं जात आहे. आतापर्यंत चार ते पाच गाड्यांना आग लावण्यात आली असून या भागातील रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.

आंदोलकांनी शुक्रवारी सकाळी बिहारच्या उपमुख्यमंत्री रेणू देवी यांच्या बेतिहा येथील घरावर हल्ला करण्यात आला. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. आंदोलकांचा मोठा जमाव रस्त्याने जाताना दिसत आहे. त्यांच्याकडून वाहनांची तोडफोड केली जात आहे. रेणू देवी यांच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार, आंदोलकांनी केलेल्या हल्ल्यात घराचे मोठे नुकसान झाले आहे. तर रेणू देवी या पाटणा येथे आहेत.

दरम्यान, आंदोलनाचे लोण देशभरात पसरू लागल्याने गृहमंत्री अमित शहा यांनी दखल घेतल्याचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे. युवकांकडून अग्निपथ ही योजना रद्द करण्याची मागणी केली जात आहे. त्यासाठी ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. योजनेच्या विरोधात बिहारमध्ये आगडोंब उसळला आहे. संतापलेल्या युवकांनी गुरूवारी इंटरसिटी एक्सप्रेसच्या काही डब्ब्यांना आग लावली होती. त्यानंतर शुक्रवारी बिहारमधील मोहिउद्दीनगर स्टेशनमध्ये जम्मू तावी गुवाहाटी एक्सप्रेस तसेच एक पॅसेंजर गाडी पेटवून दिली.

दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी नुकतीच नवी दिल्लीत या योजनेची घोषणा केली आहे. ‘अग्निपथ’ योजनेत दर वर्षी साधारणतः ५० हजार याप्रमाणे प्रत्येकी ४ वर्षांसाठी तरुणांची सैन्यभरती करण्यात येणार आहे. ४ वर्षांनी त्यातील २५ टक्के तरुणांना नियमित लष्करी सेवेत सामावून घेतले जाणार आहे, तर उर्वरित अग्निवीरांना निवृत्तिवेतन मिळणार आहे. त्यावरूनच तरुणांमध्ये संताप निर्माण झाला आहे. ही योजना रद्द करण्याची मागणी तरूणांकडून केली जात आहे.

योजनेअंतर्गत सैन्यात भरती झाल्यानंतर केवळ चार वर्षच सेवा करता येणार आहे. त्यामुळे तरूणांमध्ये रोष वाढला आहे. बिहारमधून सैन्यात जाण्याचे प्रमाण अधिक असल्याने पहिला आगडोंब याच राज्यात उसळला आहे. बुधवारपासूनच आंदोलन सुरू असून सलग तिसऱ्यादिवशी आंदोलनाची तीव्रता वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT