Mayawati sarkarnama
देश

BSP Mayawati News : 'युपी'त मायावतींचे सोशल इंजिनिअरींग फेल, बसपची घसरगुंडी कशी रोखणार..?

Pradeep Pendhare

Lok Sabha Election 2024 : उत्तर प्रदेश म्हटले की, एकेकाळी तिथे वर्चस्व गाजवलेल्या मायावतींची राजकीय महत्त्वकांक्षा समोर येते. त्यांचा राष्ट्रीय राजकारणातील दबदबा लक्षात येतो. अलीकडच्या काळात मायावती कुठेच दिसत नाही. त्यांचा राजकीय दबदबा झपाट्याने कमी होऊ लागल्याचे दिसते आहे. लोकसभा निवडणुकीत मायावतींचा बहुजन समाज पक्ष (बसप) कोणत्याही आघाडीत सहभागी न होता स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. बसपची अस्तित्वाची लढाई असताना त्यांना किती यश मिळले, असे हा खरा प्रश्न आहे.

लोकसभा 2019 पर्यंत बसपचे 21 खासदार होते. पुढच्या दहा वर्षांत म्हणजे, 2019 च्या निवडणुकीनंतर बसपच्या जागा निम्म्याने कमी झाल्या आणि दहावर आल्या. या राजकीय अस्तित्वाच्या लढाईत 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत पक्षाला खातेही उघडता आले नव्हते. उत्तर प्रदेशच्या राजकारणात टिकून राहण्यासाठी मायावतींचा Mayawati हा कसोटीचा काळ आहे. त्यांच्या पक्षाला यावेळी परफाॅर्मन्स दाखवावाच लागेल. पक्षाने 2019 मध्ये जेवढ्या जागा जिंकल्या होत्या, तेवढ्या जागा जिंकाव्या लागतील. तसे आवश्यकच आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा 2019 च्या निवडणुकीत बसपने अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षासोबत युती केली होती. याचा फायदा सपपेक्षा बसपला जास्त झाला. बसपचा प्रभाव वेगाने घटत चालला असल्याचे या पक्षाचे नेते- कार्यकर्ते मान्य करतात. बसप BSP वाढविण्यासह नव्या दमाचे कार्यकर्ते जोडण्यासाठी मायावती यांनी आपले पुतणे आकाश आनंद यांना राष्ट्रीय समन्वयक बनवत मोठी जबाबदारी दिली होती. तथापि काही मुद्द्यांवरून बिनसल्याच्या पार्श्वभूमीवर अलीकडेच मायावती यांनी आकाश यांची पदावरून हकालपट्टी करत दिल्लीला पाठवले. दरम्यान, यावेळी मात्र बसपपेक्षा सपच्या उमेदवारांची सर्वत्र जास्त चर्चा आहे. दोन्ही पक्षांनी अनेक मतदारसंघातले उमेदवार वारंवार बदलले आहेत. Mayawati's battle for political survival in Uttar Pradesh

सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग फसला

मुस्लिम, दलित आणि ब्राह्मण समाजाला एकत्र आणत सोशल इंजिनिअरिंगचा यशस्वी प्रयोग मायावती यांनी केला होता. मात्र काळाच्या ओघात हा प्रयोग पुढे फोल ठरत गेला. हक्काची दलित मते भाजपसह BJP इतर पक्षांकडे जाऊ लागल्याने मायावती यांची चिंता वाढली आहे. 2019 च्या निवडणुकीत बसपला उत्तर प्रदेश वगळता इतर कोणत्याही राज्यात यश मिळालेले नाही. उत्तर प्रदेशात 19 टक्के मतांसह पक्षाला 10 जागा मिळाल्या होत्या. राज्यात दुसऱ्या क्रमांकाची मते त्यावेळी बसपकडे होती. यावेळी उत्तर प्रदेशातील 80 पैकी 79 मतदारसंघात बसपचे उमेदवार मैदानात असून त्यातील 20 उमेदवार मुस्लिम समाजाचे आहेत.

सपच्या मुस्लिम मतांवर बसपचा डोळा आहे. पक्षाने 23 ओबीसी उमेदवार रिंगणात उतरवले आहेत तर 18 उमेदवार उच्चवर्णीय समाजाचे असून सर्वात कमी 17 उमेदवार दलित समाजाचे आहेत. दिल्ली, पंजाब, राजस्थान, उत्तराखंड, छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेश अशा काही राज्यांत बसपने प्रस्थापित पक्षांची झोप उडवली होती. मात्र या राज्यांत आता नावालाच पक्ष राहिला आहे. विधानसभा 2018 च्या निवडणुकीत छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात पक्षाचे प्रत्येकी दोन तर राजस्थानमध्ये सहा आमदार निवडून आले होते. आगामी काळात पक्षाची घसरगुंडी कायम राहिल्यास पक्षाची पूर्ण वाताहत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर पक्षाला तारण्यासाठी मायावतींची धडपड सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT