Navneet Rana News : 'केजरीवालांकडून दुसरी अपेक्षा तरी काय करणार?' ; नवनीत राणांचे टीकास्त्र!

Navneet Rana VS Arvind Kejriwal : महिलांचा सन्मान न केल्यास दिल्ली-पंजाबमधील महिला केजरीवालांना त्यांची जागा दाखवून देतील, असा इशाराही नवनीत राणांनी दिली आहे .
Navneet Rana VS Arvind Kejriwal
Navneet Rana VS Arvind KejriwalSarkarnama

BJP Vs AAP Politics News : मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी त्यांचाच खासगी स्वीय सहायक मारहाण करतो. त्यावर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल काहीच बोलत नाही. उलट पंतप्रधान मोदींवर टीका करतात. महिलांवर काहीच बोलत नाही. दुःख आहे, आश्चर्य पण आहे. अरविंद केजरीवाल यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार?, अशा शब्दात खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर टीका केली.

आम आदमी पक्षाचे नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) यांचे खासगी स्वीय सहायक विभव कुमार यांनी आम आदमी पार्टीच्या खासदार स्वाती मालीवाल यांना मारहाण केली. विभव कुमार यांनी ही मारहाण दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी केल्याचा आरोप खासदार मालीवाल यांनी केला. खासदार मालीवाल यांच्या फिर्यादीवरून दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करत विभव कुमार यांना अटक केली आहे.

तसेच, दिल्ली पोलिसांनी तपासासाठी दिल्लीच्या मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानचे सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहे. दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री निवासस्थानाची दोनदा तपासणी केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Navneet Rana VS Arvind Kejriwal
Operation Jhaadu : PM मोदींकडून ‘ऑपरेशन झाडू’ला सुरूवात! दिल्लीत राजकारण तापलं...

या सर्व प्रकारावर 'आप'ने भाजपकडून हे सर्व षड्यंत्र रचलं जात असल्याचा आरोप केला आहे. अरविंद केजरीवाल आणि 'आप'च्या नेत्यांनी रविवारी दिल्लीच्या भाजपच्या कार्यालयावर मोर्चा नेला. दिल्लीतील या प्रकरणावरून राजकारण तापू लागले आहे. तर भाजपच्या महिला नेत्यांकडून 'आप'वर निशाणा साधला जात आहे. अमरावतीच्या खासदार आणि भाजपच्या तिकीटावर यंदाची निवडणूक लढवलेल्या नवनीत राणा यांनी आम आदमी पार्टीचे नेते मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. अरविंद केजरीवाल यांच्याकडून महिलांबाबत अपेक्षाच करू शकत नाही, असे नवनीत राणा(Navneet Rana) यांनी म्हटले आहे

नवनीत राणा म्हणाल्या, "दिल्लीच्या महिलांना मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याकडून अपेक्षा होत्या. 'आप'कडून स्वाती मालीवाल या दिल्लीतील महिलांचे प्रतिनिधीत्व करत होत्या. ही महिलाच सांगत आहे की, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी त्यांच्याच खासगी स्वीय सहायकांनी मारहाण केली. तसेच, राजीनाम्यासाठी जबरदस्ती केल्याचे सांगत आहे.'

Navneet Rana VS Arvind Kejriwal
Uttar Pradesh News : राहुल गांधी- अखिलेश यादवांच्या उपस्थितीने जमाव अनियंत्रित ; चेंगराचेंगरीची शक्यतेने सभा रद्द...

याशिवाय 'मुख्यमंत्री केजरीवाल यांनी महिलांचा सन्मान ठेवायला पाहिजे होता. परंतु मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान मोदींवर टीका केली. महिलांच्या बाजूने एकही शब्द बोलले नाही. त्यांच्या निवासस्थानी मारहाण झाली, त्यावर ते बोलत नाही, अशा व्यक्तींकडून अपेक्षाच ठेवू शकत नाही. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याकडून दिल्ली, पंजाबमधील महिलांनी काय अपेक्षा ठेवावी?' असा सवाल नवनीत राणा यांनी केला.

याचबरोबर 'हिंदुस्थानची संस्कृती अशी आहे की, महिलांचा सन्मान करते. परंतु मुख्यमंत्री केजरीवाल फक्त आणि फक्त मतदानासाठी राजकारण करत आहेत. महिलांचा जो सन्मान करतो, तोच देशावर राज्य करू शकतो. महिलांचा सन्मान न केल्यास तेथील मुख्यमंत्र्यांना महिला त्यांची जागा दाखवून देऊ शकतात.', असा इशाराही नवनीत राणा यांनी दिला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com