US Presidential Election : Sarkarnama
देश

US Presidential Election : डोनाल्ड ट्रम्पसाठी भारतीय 'रामास्वामीं'चा त्याग ; राष्ट्राध्यक्षपदाचा दावा सोडला...

Chetan Zadpe

US Presidential Election : भारतीय वंशाचे अमेरिकेतील राजकारणी विवेक रामास्वामी यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून आता माघार घेतली आहे. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूक आता ते लढणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आयोवा येथील रिपब्लिकन कॉकसमधील निराशाजनक कामगिरीनंतर 38 वर्षीय रामास्वामी यांनी हा निर्णय घेतला. येथील रिपब्लिकन पक्षाच्या मतदानात माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले आहेत. (Latest Marathi News)

बायोटेक उद्योजक असेलले रामास्वामी यांनी निवडणूक प्रचार सोडत असल्याची घोषणा केली. यावेळी ते म्हणाले, 'माझ्यासाठी राष्ट्राध्यक्ष होण्याचा कोणताही मार्ग नाही उरला नाही, त्यामुळे मी माझा प्रचार या क्षणापासून संपवत आहे. मी डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्या विजयाबद्दल अभिनंदन करतो, तसेच माझ्या पक्षातील उमेदवार ट्रम्प यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

यापूर्वी ट्रम्प यांनी रामास्वामी यांच्यावर जाहीर टीका केली होती. निवडणूकीत प्रसिद्धी मिळविण्यासाठी भारतीय-अमेरिकन उद्योजक असलेले रामास्वामी यांनी चुकीच्या डावपेचांचा वापर केल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला. दरम्यान माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची हा आरोप रामास्वामी यांनी यांच्या ट्रम्प यांच्यासंबंधी व्हायरल झालेल्या पोस्टनंतर आली आहे. रामास्वामी यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान लोकांनी घातलेल्या टी-शर्टवर लिहिलेल्या घोषणांमुळे ट्रम्प संतापले होते. टी-शर्टवर 'सेव्ह ट्रम्प, व्होट विवेक' असे लिहिले होते. रामास्वामी यांनी शनिवारी आयोवा येथील रॉक रॅपिड्समधील कार्यक्रमानंतर तरुणांसोबतचा एक फोटो पोस्ट केला होता, ज्यामुळे ट्रम्प यांचा रागाचा पारा चढला होता.

रामास्वामी यांची ट्रम्प यांना कडवी झुंज -

रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी रामास्वामी हे ट्रम्प यांना कडवी टक्कर देऊ शकतात, असा राजकीय जाणकारांचा विश्वास होता. पण आता रामास्वामी यांनी माघार घेतली आहे. रामास्वामी आता अमेरिकेतील न्यू हॅम्पशायरमध्ये ट्रम्प यांच्यासोबत रॅलीही काढणार आहेत.

रामास्वामी यांनी मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत सहभागी होण्याची घोषणा केली होती, अशी माहिती आहे. तोपर्यंत त्यांना राजकीय वर्तुळात फार कमी लोक ओळखत होते. पण, त्यांनी निवडणुकीसाठी इमिग्रेशन आणि अमेरिका-फर्स्ट असे मुद्दे जोरदारपणे मांडले. त्यामुळे रिपब्लिकन मतदारांमध्ये त्यांची ओळख निर्माण करण्यात त्यांना खूप मदत झाली होती. मात्र आता त्यांनी माघार घेतली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT