Bengal Sandeshkhali News Sarkarnama
देश

Bengal Sandeshkhali News : मोदींच्या बंगाल दौऱ्याआधीच ममतांनी पलटवला डाव; भाजप नेत्याला 'सेक्स रॅकेट'मध्ये अटक...

Mamata Banerjee Sandeshkhali News : संदेशखाली येथील महिलेवरील अत्याचाराचा घटनेवरून भाजप-टीएमसीमध्ये घमासान...

Chetan Zadpe

West Bengal News : पश्चिम बंगाल पोलिसांनी आज (दि. २३ फेब्रुवारी) भारतीय जनता पार्टीचे नेते सब्यसाची घोष यांना अटक केली. घोष यांच्यावर हावडा येथे सेक्स रॅकेट चालवल्याचे आरोप आहेत. संदेशखाली येथे एका महिलेवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेवरून भाजपने बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर तुफान हल्लाबोल केला होता. याच आरोप-प्रत्यारोपाच्या दरम्यान आता ही अटक झाल्याने बंगालमधील राजकीय वातावरण पेटले आहे. (Mamata Banerjee Bengal Sandeshkhali News)

तृणमूलचे नेते शेख शाहजहान आणि त्यांच्या साथीदारांवर लैंगिक शोषणाचे आरोप केल्याची माहिती आहे. यामुळे तृणमूल काँग्रेस आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर विरोधकांकडून आणि विशेषत: भाजपकडून जोरदार टीका केली जात होती. याच आरोपावर आणि या मुद्द्यावर भाजपला बॅकफूटवर ढकलण्यासाठी बंगाल सरकारकडून भाजप नेत्याच्या अटकेच्या मुद्द्यावर आता भाजपवर पलटवार सुरू केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे म्हणणे आहे, "बंगाल पोलिसांनी हावडा येथील सब्यसाची घोष यांच्या हॉटेलमध्ये चालवलेले वेश्याव्यवसाय रॅकेट उघडकीस आणले आहे. टीएमसीने अधिकृत एक्स (X) हँडलवर पोस्ट केली आहे, त्यात म्हटले आहे, 'बंगाल भाजपचे नेते सब्यसाची घोष संकरेल येथील त्यांच्या हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलींचे वेश्याव्यवसाय रॅकेट चालवताना पकडले गेले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी 11 आरोपींना अटक केली आहे. तसेच घटनास्थळावरून 6 पीडित मुलींची सुटका करण्यात आली आहे. हाच भाजपचा चेहरा आहे. ते मुलींचे रक्षण करत नाहीत, ते एजंटचे रक्षण करतात!'

भाजप आक्रमक -

दुसरीकडे बंगालच्या (West Bengal) संदेशखली प्रकरणावरून भाजप टीएमसीवर सातत्याने हल्लाबोल करत आहे. भाजप नेते सुधांशू त्रिवेदी म्हणाले, 'पश्चिम बंगालमध्ये अत्याचार झालेल्या, दु:खी झालेल्या आणि अत्याचाराने पूर्णपणे तुटलेल्या महिलांच्या दयनीय आवाजाने मन विषण्ण होत आहे. खेदाची गोष्ट म्हणजे तिथले सरकार या विषयावर अत्यंत असंवेदनशील आणि अमानवीपणे वागत आहे. आजही भाजप नेत्यांना तिथे जाण्यापासून रोखले जात आहे. सरकारने तेथे कलम 144 लागू केले आहे. महिलांना न्याय देण्याऐवजी या प्रकरणाचा पुढे पाठपुरावा करू नये म्हणून तिथली एसआयटी त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे."

मोदींच्या दौऱ्याची चर्चा -

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) 6 मार्च रोजी पश्चिम बंगाल दौऱ्यावर जाणार असून, ते संदेशखालीजवळ एका महिला संमेलनास संबोधित करणार आहेत. पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगना जिल्ह्यातील संदेशखाली हे सध्या चर्चेत आहे. येथील महिलांकडून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार आणि हिंसाचार झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT