BJP News : भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाची घोषणा एप्रिल महिन्यात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघ मुख्यालयाला भेट दिल्यानंतर संघटनात्मक निवडणुका पूर्ण करण्याचे काम वेगाने सुरु आहे. संसदेच्या अधिवेशनानंतर काही राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा केली जाणार आहे.
त्यानंतर आता भाजपकडून जेपी नड्डा यांच्या उत्तराधिकाऱ्याची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. नव्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड करताना पीएम मोदी, शहांसोबतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भूमिका महत्वाची असणार आहे. गडकरी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या जवळचे आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi ) यांच्या संघ मुख्यालयाच्या दौऱ्यानंतर आता भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाची घोषणा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या नियुक्तीसाठी आणखी विलंब होणार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 4 एप्रिलला संपत आहे. संघाच्या सूत्रांने दिलेल्या माहितीनुसार, नव्या अध्यक्षांच्या निवडीमध्ये संघ, पंतप्रधान मोदी आणि अमित शहा तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भूमिका महत्त्वाची असू शकते. 2009 ते 2013 या काळात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले नितीन गडकरी आजही संघ नेतृत्वाच्या गुडबुकमध्ये आहेत. पीएम मोदींच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरी, फडणवीस यांच्यासह संघाचे नेते उपस्थित होते.
घोषणा कधी होणार?
भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षाची घोषणा भाजपचा स्थापना दिवस 6 एप्रिलला आहे. त्यादिवशी घोषणा केली जाणार का ? याची उत्सुकता आहे. यानंतर 18 एप्रिलला भाजपने राष्ट्रीय कार्यकारिणी परिषद होणार आहे. या बैठकीत नव्या अध्यक्षाची घोषणा होऊ शकते. थोडा विलंब झाला तरी जेपी नड्डा यांच्या उत्तराधिकारीची घोषणा एप्रिलमध्ये होईल.
येत्या काही दिवसांत भाजपच्या संघटनात्मक निवडणुका पूर्ण होणार असल्याची माहिती सूत्रांने दिली आहे. 13 राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्षांची घोषणा करण्यात आली आहे. 19 राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्षांची अजून घोषणा व्हायची आहे. राष्ट्रीय अध्यक्षांसाठी 19 राज्यांमधून प्रदेशाध्यक्षांची निवड करणे आवश्यक आहे.
भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार?
भाजपच्या (BJP) राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, विनोद तावडे, शिवराज सिंग चौहान, मनोहरलाल खट्टर, डी. पुरंदरेश्वरी या ज्येष्ठ नेत्यांची नावे सध्या आघाडीवर असल्याची माहिती सुत्रांनी दिली. आता यामधील भाजपच्या अध्यक्षपदी कुणाच्या नावाची वर्णी लागणार? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. भाजपच्या नव्या अध्यक्षाबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे.
नड्डा राष्ट्रीय अध्यक्ष कसे झाले?
2019 मध्ये अमित शहा गृहमंत्री झाल्यानंतर जेपी नड्डा भाजपचे कार्याध्यक्ष झाले होते. सहा महिन्यांनंतर, 30 जानेवारी 2020 रोजी त्यांची एकमताने राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. नड्डा यांचा कार्यकाळ जानेवारी 2023 मध्ये संपला होता. पण लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना जून 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. यानंतरही नड्डा मुदतवाढीवर आहेत. अशा स्थितीत त्यांनी अध्यक्ष म्हणून दीर्घ कालावधी पूर्ण केला आहे. नड्डा हे सध्या केंद्रीय आरोग्य मंत्री आहेत.
नवीन अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली होणार 12 निवडणुका
भाजपचा नवा अध्यक्ष निवड झाल्यानंतर 2025 मध्ये बिहार विधानसभा, त्यानंतर 2026 मध्ये आसाम आणि केरळसह तमिळनाडू आणि पश्चिम बंगालच्या निवडणुका होणार आहेत. या पाच राज्यांच्या निवडणुकांसोबतच 2027 मध्ये राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्याही निवडणुका होणार आहेत.
अशा स्थितीत पुढील तीन वर्षांत एकूण 12 महत्त्वाच्या निवडणुका होणार आहेत. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी परिषदेची बैठक 18 एप्रिल ते 20 एप्रिल या कालावधीत बेंगळुरू येथे होणार आहे. यामध्ये राष्ट्रीय अध्यक्षांची घोषणा होऊ शकते. या बैठकांच्या तारखा थोड्या पुढे सरकल्या तरी एप्रिलअखेर भाजपला राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.