Delhi BJP CM Face Sarkarnama
देश

Delhi BJP CM Face News : अडीच दशकांहून अधिक काळानंतर दिल्लीत सत्तेवर येणाऱ्या भाजपचा मुख्यमंत्री कोण?

Delhi Vidhan Sabha Election Result 2025 : जाणून घ्या, भाजप चर्चेतील चेहऱ्यांपैकीच एकाला संधी देणार की दिल्लीतही धक्कातंत्र वापरणार? ; कोणती नावे आहेत चर्चेत अन् भाजपच्या दिल्ली अध्यक्षांनी नेमकं काय म्हटलं आहे?

Mayur Ratnaparkhe

Delhi Assembly Election Result and BJP News : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा आज निकाल समोर आला आहे. यामध्ये अडीच दशकाहून अधिक काळानंतर भाजपने दिल्लीची सत्ता ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे. सकाळापासून मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हाच भाजपने कलांमध्ये आघाडी घेतली होती. तर दुसरीकडे आम आदमी पार्टीचे केजरीवालांसह दिग्गज हे कधी आघाडी तर कधी पिछाडीवर असे दिसून आले. नंतर हळूहळू निकालाचे चित्र स्पष्ट होवू लागले तेव्हा, आम आदमी पार्टीसाठी ते अतिशय धक्कायदाक होते.

कारण, या निवडणुकीत आपचे सर्वेसर्वा आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal), उपमुख्यमंत्रई मनीष सिसोदिया हे दोघेही पराभूत झाले. तर विद्यमान मुख्यमंत्री आतिशी यांना आपली जागा राखण्यासाठी संघर्ष करावा लागला. दुसरीकडे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण दिसून आले. कारण, यंदा दिल्लीकरांना भाजपला प्रचंड बहुमत दिल्याचे दिसून आले.

त्यामुळे आता भाजपचा(Manoj Tiwari) मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार आहे, याबाबत विविध अंदाज वर्तवले जात आहेत. अनेक चेहरे देखील चर्चेत आहेत. यामध्ये भाजपने नेते मनोज तिवारी, प्रवेश वर्मा, रविंद्र सिंह नेगी, दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांचे नावे आघाडीवर आहेत. मात्र तरीही भाजप आपल्या स्टाइलनुसार धक्कातंत्र वापरणार की चर्चेतील चेहऱ्यांपैकीच एकाची मुख्यमंत्रिपदासाठी निवड करणार हे लवकरच स्पष्ट होईल. सध्या तरी भाजप नेते मुख्यमंत्रिपदाबाबत केंद्रीय नेतृत्व निर्णय घेणार असल्याचे सांगत आहेत.

मतमोजणी सुरू झाल्यानंतर समोर येणाऱ्या कलानुसार भाजपकडे सत्ता येत असल्याचे स्पष्ट होवू लागले. त्यावर भाजपचे(BJP) दिल्ली अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा म्हणाले, सुरुवातीचे कल आमच्या अपेक्षेप्रमाणे आहेत. परंतु आम्ही निकालाची वाट बघू. आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फार कष्ट घेतले आहेत. ही विजय आमच्या केंद्रीय नेतृत्वाचा विजय असेल. आम्ही दिल्लीच्या मुद्य्यांच्या आधारावर निवडणूक लढली आहे. परंतु अरविंद केजरीवाल यांनी मुद्य्यांवरून भटकवण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्रीय नेतृत्वच मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय घेईल.

दिल्ली विधानसभा निवडणुकीने आता निर्णायक वळणावर पोहोचली आहे. दिल्लीत 27 वर्षानंतर भाजपचं कमळ पुन्हा फुललं आहे. भाजपच्या या जोरदार कमबॅकनंतर दिल्लीत भाजपचे कमळ फुलल्यास दिल्लीकरांसाठी हा मैलाचा दगड ठरला आहे. भाजपची दिल्लीत एकहाती सत्ता आल्यामुळे आणि दिल्लीकरांनी या निवडणुकीत भाजपवर दाखवलेल्या विश्वासामुळे दिल्लीकरांची चांदी होणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT