Karnataka election 2023
Karnataka election 2023  Sarkarnama
देश

Karnataka election 2023 : जुने म्हैसूर ठरवणार कर्नाटकचा किंग कोण ? तिहेरी लढतीत कोण बाजी मारणार..

Mangesh Mahale

Who will win Karnataka election 2023: कर्नाटकात भाजप पुन्हा सत्ता स्थापन करणार की काँग्रेस सत्ता खेचून आणणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. १० मे रोजी कर्नाटकमध्ये विधानसभेची (Karnataka election 2023) निवडणूक होत असून १३ मे रोजी मतमोजणी आहे.

कर्नाटकात सत्ता स्थापन करण्यासाठी जुन्या म्हैसूर कल कुणाच्या बाजूनं येणार यावरुन ही निवडणूक निर्णायक ठरणार आहे. आत्तापर्यत या ठिकाणी थेट लढत झाली आहे, पण यंदाच्या निवडणुकीतील चित्र बदलले आहे.

जुने म्हैसूर ज्या पक्षाच्या पारड्यात मत टाकणार त्या पक्षाच्या हातात कर्नाटकची सत्ता येणार, हे स्पष्ट आहे. त्यामुळे भाजपने याठिकाणी प्रचारात जोरदार ताकद लावली आहे. या परिसरातून तीन-तीन नेता मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत.

तीनही पक्षांनी कंबर कसली..

जुने म्हैसूर जेडीएस आणि काँग्रेस यांच्यात लढाई होती, पण यंदा भाजपही पूर्ण ताकदीने मैदानात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी पूर्वी विविध योजनांची सुरवात केली आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभेसाठी या ठिकाणी तिहेरी लढत होणार आहे.

प्रामुख्यांनी वोक्कालिंगा समाजाचे प्राबल्य असलेला जुने म्हैसूर हा परिसर आहे. या समाजाला आकर्षित करण्यासाठी तीनही पक्षांनी आपली रणनीती आखली आहे. कारण जुने म्हैसूर जो जिंकणार तोच कर्नाटकचा किंग होणार हे निश्चित आहे.

३५ जागा जिंकण्याचे भाजपचे लक्ष्य

जुने म्हैसूर परिसरातील ३५ जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपचे आहे. कोलार. चिक्काबल्लापूर, बैंगलुरु ग्रामीण, तुमकुरु, रामनगर, मांड्या, मैसुरु, चामराजनगर आणि हासन जिल्ह्यात ५२ जागा आहेत. या जागा निवडणुकीत महत्वाच्या मानल्या जात आहेत.

मांड्यामधील अपक्ष खासदार सुमलचता अंबरीश यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्या लोकप्रिय स्टार अंबरीश यांच्या पत्नी आहेत, त्यांचा प्रभाव या परिसरात आहे. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांची या परिसरात नुकतीच रॅली झाली आहे. येथे ३५ जागा मिळतील, असा विश्वास भाजपला आहे.

जेडीएस ठरणार पुन्हा एकदा किंगमेकर

येथील मायशुगर आणि पांडवपुरा साखर कारखाना भाजपने पुन्हा सुरु केला आहे. त्याचा फायदा भाजपला मिळेल, असे जाणकारांचे मत आहे. जेडीएसचा बालेकिल्ला असलेल्या या परिसरात ९३ व्या वर्षी माजी पंतप्रधान एचडी देवगौडा यांनी प्रचार रॅलीत सहभाग घेऊन काँग्रेस, भाजपला आव्हान दिले आहे.

त्याचे चिंरजीव माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी पंचतंत्र यात्रेचे आयोजन केले होते. जेडीएसला येथे ३० ते ४० जागा मिळतील, असे राजकीय विश्लेषक सांगतात. जेडीएस पुन्हा एकदा किंगमेकर ठरणार आहे.

वोक्कलिंगा समाजाला आकर्षित करण्यासाठी काँग्रेसचा जोर

काँग्रेससाठी ही निवडणूक महत्वाची आहे. कारण माजी मुख्यमंत्री सिद्धारमैया यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. चामुंडेश्वरी येथून त्यांचा पराभव झाला होता. ही जागा जिंकणे त्यांच्यासाठी मोठे आव्हान आहे.

येथील वोक्कलिंगा समाजाला आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने जोर लावला आहे, गेल्या वेळी जेडीएसने ही जागा जिंकली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने येथे चांगली कामगिरी केली आहे. त्याचा फायदा विधानसभेत होणार आहे.

बडे नेते एकमेकांच्या समोर

काँग्रेसचे सिद्धारमैया आणि डिके शिवकुमार, जेडीएसचे कुमारस्वामी हे तिघेही स्थानिक आहे. शिवकुमार आणि कुमारस्वामी हे वोक्कालिंगा समाजाचे आहेत. त्यांना यंदाच्या निवडणुकीच्या आपल्या जातबांधवांना भावनिक हाक दिली आहे. अशा पद्धतीने जुने म्हैसूर येथे अनेक बडे नेते एकमेकांच्या समोर उभे ठाकणार आहेत. त्यामुळे जुने म्हैसूर जो जिंकणार त्यांच्या हाती कर्नाटकाच्या सत्तेची चावी असणार, हे सांगायला कुण्या राजकीय पंडिताची गरज नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT