Supriya Sule : राऊतांना धमकी आल्यानंतर सुळेंचा फडणवीसांना सल्ला ; झेपत नसेल तर गृहमंत्रालय..

Supriya Sule on sanjay raut : राऊतांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
Supriya Sule, Devendra Fadnavis
Supriya Sule, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Supriya Sule on sanjay raut : लॉरेन्स बिश्नोई गँगकडून ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी आल्यानं खळबळ उडाली आहे. जीवे मारण्याच्या धमकीचा मॅसेज संजय राऊत यांच्या मोबाईलवर आला आहे. यानंतर राऊतांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

राऊतांना मिळालेल्या धमकीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. पुण्यात त्या माध्यमांशी बोलत होते. सुळे यांनी राज्याचे गृहमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

"राज्यात होणाऱ्या दंगली, कोयता गँगचा धुमाकूळ, संजय राऊत यांना दिली जाणारी धमकी, हे राज्यातील गृहमंत्र्यांचे अपयश आहे. गृहमंत्रालय जर झेपत नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा देऊन गृहमंत्रालय सोडून द्या," असा शब्दात सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांवर घणाघात केला आहे.

Supriya Sule, Devendra Fadnavis
Naresh Mhaske : 'अजितदादांचे पुतळे जाळा' असे सांगणे ही गद्दारी की खुद्दारी ? ; आव्हाडांना म्हस्केंचा सवाल

छत्रपती संभाजीनगर परिसरात झालेला राड्याप्रकरणी सुळे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र डागले आहे. त्या म्हणाल्या, "राज्यात झालेली दंगल ही गंभीर बाब आहे. त्यामुळे राज्यात कायदा, सुव्यवस्था राखणं जर जमत नसेल तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा,"

Supriya Sule, Devendra Fadnavis
Maharashtra Politics : मुख्यमंत्री शिंदेंचा अपमान ; राऊतांवर मानहानीचा दावा ; राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर...

राऊतांना मिळालेली धमकी ही गंभीर बाब आहे. संजय राऊत हे खासदार आहेत आणि या देशाचे वरिष्ठ नेते आहेत, त्यामुळे त्यांना सुरक्षा देण्यात यावी. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तत्काळ राऊत यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी, असेही सुळे म्हणाल्या.

हा धमकीचा मॅसेज राऊत यांच्या मोबाईलवर आला आहे. 'हिंदूविरोधी असल्यामुळे मारून टाकू, दिल्लीमध्ये आल्यावर AK 47 ने उडवून टाकू, मुसेवाला टाईप मारू.. लॅारेन्स के और से मॅसेज है…. सलमान और तू फिक्स….तयारी करके रखना….' असं या मॅसेजमध्ये म्हटलं आहे. तसेच या मॅसेजमध्ये संजय राऊत यांना शिवीगाळ देखील करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com