B. S. Yediyurappa
B. S. Yediyurappa Sarkarnama
देश

Karnataka BJP News : भाजपत मोठी घडामोड : उमेदवार निवडीवर येडियुराप्पा नाराज?; दिल्लीहून तातडीने बंगळूरला परतले

सरकारनामा ब्यूरो

बंगळूर : माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा (B. S. Yediyurappa) उमेदवार निवडीबाबत दिल्लीत झालेल्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीबाबत नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे उमेदवारांची यादी प्रसिद्ध होण्यापूर्वीच येडियुराप्पा दिल्लीहून बंगळूरला निघून आले आहेत. सोमवारी सायंकाळी ते सव्वा पाचच्या विमानाने ते बंगळूरला आले आहेत. (Yediyurappa upset over BJP's candidate selection?)

येडियुराप्पा यांनी आपल्या जवळच्या मित्रांना सांगितले की, माझी हायकमांडशी चर्चा संपली आहे, म्हणून मी बंगळूरला येत आहे. भाजपचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (JP Nadda) यांच्या घरात बैठकीचे आयोजन केले होते. नड्डा घरी आल्यानंतर १० मिनिटांत येडियुराप्पा घराबाहेर आले आणि बंगळूरकडे निघून गेले.

मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर कर्नाटक नेत्यांच्या स्वतंत्र बैठकांमध्ये येडियुराप्पा सहभागी नव्हते, अशी माहिती आहे. राज्य नेत्यांची स्वतंत्र बैठकच त्यांच्या निराशेचे कारण असल्याचे बोलले जात आहे. रविवारच्या बैठकीनंतर येडियुराप्पा निराश होऊन बाहेर पडल्याचे सांगण्यात येत आहे.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आजच्या बैठकीसाठी गेल्यानंतर येडियुराप्पा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी आले. चर्चेदरम्यानच माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा नड्डा यांच्या घरातून बाहेर पडत गेटवर आले. मात्र बैठकीनंतर मुख्यमंत्री बोम्मई निघून गेल्यानंतर नड्डा यांच्या घरी येडियुराप्पा पुन्हा आले. परंतु अवघ्या १० मिनिटांनी येडियुराप्पा घराबाहेर पडले.

भाजपच्या बैठकीबाबत प्रतिक्रिया देताना येडियुराप्पा म्हणाले, ‘‘रविवारी सर्वच मतदारसंघांबाबत चर्चा होती. मात्र काही मतदारसंघाबाबत संभ्रम निर्माण झाला होता. अध्यक्षांनी त्याबाबत तपशील मागितला, म्हणून मी तपशील दिला आहे. उमेदवारी निवडीची यादी आज रात्री किंवा उद्या प्रसिद्ध होईल. मी दिलेली माहिती, मते ज्येष्ठ नेत्यांनी ऐकून घेतली आहेत.’’ सकाळी बैठकीला गैरहजर का होता, असे विचारले असता ते म्हणाले की, त्यांनी काही रणनीती आखण्यासाठी स्वतंत्र बैठक बोलावली होती म्हणून म्हणून मी निघून आलो.

येडियुराप्पा नाराज नाहीत : नड्डा

नड्डा यांच्याशी झालेल्या भेटीनंतर येडियुराप्पा यांनी जाहिरातीसह अनेक मुद्द्यांवर चर्चा केल्याचे नड्डा यांनी सांगितले. आम्ही सरकार स्थापन करणार आहोत, यात शंका नाही. उमेदवारी वाटपात विलंब होत असल्याने येडियुराप्पा नाराज नाहीत, मीही नाराज नाही, आनंदी आहे, असे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT