Dr. Nandatai Babhulkar Sarkarnama
कोल्हापूर

Kolhapur News : विधानसभेतील वाद जिल्हा परिषदेला पेटणार! चंदगडमध्ये महाविकास आघाडीतच कुस्ती

Kolhapur News : लोकसभा निवडणुकीत एकदिलाने लढलेल्या चंदगड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची मने विधानसभा निवडणुकीत दुभंगली.

Rahul Gadkar

Kolhapur News : लोकसभा निवडणुकीत एकदिलाने लढलेल्या चंदगड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची मने विधानसभा निवडणुकीत दुभंगली. महायुतीचा सामना करण्यापेक्षा महाविकास आघाडीच्याच उमेदवाराचा काटा काढण्यात व्यस्त राहिल्याने त्याचा फटका महाविकास आघाडीला बसला.

महाविकास आघाडीच्या उमेदवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या डॉ. नंदाताई बाभुळकर यांच्याच विरोधात स्वाकियांनी बंड केले. मात्र, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा चंदगड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतच कुस्ती रंगणार असल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे. डॉ. बाभुळकर यांनी इशारा दिल्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांना मोठे आव्हान असणार आहे.

चंदगड विधानसभा मतदारसंघात निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार डॉ. नंदाताई बाभुळकर यांच्या विरोधात विकास आघाडीतीलच आणि काँग्रेसचे अप्पी पाटील त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. गोपाळराव पाटील यांनी बंद केले. ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंत्रे यांनी देखील महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मदत केली आहे. त्याचा फटका डॉ. नंदाताई बाभुळकर यांना बसला. चंदगड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष भाजपचे सहयोगी सदस्य आमदार शिवाजीराव पाटील यांचा विजय झाला. त्यामुळे चंदगड मधील महाविकास आघाडीतील अंतर्गत संघर्ष पेटला होता.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील अंतर्गत संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या डॉक्टर बाबुळकर यांनी नुकताच मेळावा घेत विधानसभा निवडणुकीत धोका देणाऱ्यांची गय करणार नसल्याचे सांगितले आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती आणि गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत अशांना धडा शिकवणार असल्याचा इशारा देखील दिला आहे. आप्पी पाटील हे जिल्हा परिषद निवडणूक तर गोपाळराव पाटलांचे चिरंजीव विशाल पाटील जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यानिमित्ताने डॉ. बाबुळकर यांनी कार्यकर्त्यांना पासूनच सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांना महत्त्व देण्याचे स्पष्ट करत धोका देणाऱ्यांना देखील धडा शिकवणार असल्याचे सांगितल्याने आगामी काळात हा संघर्ष आणखीन तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

नेमक्या काय म्हणाल्या डॉ. बाभुळकर?

लोकसभा निवडणुकीत खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्यासाठी जीवाचे रान केले. पण विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील काहींनी मला एकाकी पाडले. गद्दारी करत फसवणुकीचे राजकारण केले, पाठीत खंजीर खुपसला अशा काहींना आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ‘गोकुळ’च्या निवडणुकीत घरी पाठविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही’, असा इशारा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या डॉ. नंदाताई बाभूळकर यांनी दिला. चंदगड तालुक्यातील कानडेवाडी येथे हा मेळावा संपन्न झाला. आगामी जिल्हा परिषद, गोकुळ आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा आयोजित केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT