
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर जोरदार टॅरिफ स्ट्राईक केला आहे. त्यानुसार, भारतावर २५ टक्के टॅरिफ लागू करण्यात आलं आहे. १ ऑगस्टपासून हे टॅरिफ लागू होणार असल्याचं ट्रम्प यांनी ट्रूथ या सोशल मीडिया अकाऊंटवरुन याची घोषणा केली आहे. हा भारतासाठी मोठा झटका मानला जात आहे.
ट्रम्प आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हणतात की, "लक्षात ठेवा, भारत आमचा मित्र असला तरी, गेल्या काही वर्षांत आम्ही त्यांच्याशी तुलनेनं कमी व्यवसाय केला आहे. कारण त्यांचं टॅरिफ खूप जास्त आहेत, जगातील सर्वात जास्त आहेत आणि त्यांच्याकडे कोणत्याही देशापेक्षा सर्वात कठीण आणि वाईट गैर-मौद्रिक व्यापार अडथळे आहेत. तसंच, त्यांनी नेहमीच त्यांच्या लष्करी उपकरणांचा मोठा भाग रशियाकडून खरेदी केला आहे. तसंच चीनसह ते रशियाचे ऊर्जेचे सर्वात मोठे खरेदीदार आहेत, अशा वेळी जेव्हा प्रत्येकाला रशियानं युक्रेनमध्ये होणारी हत्या थांबवावी असं वाटतं आहे. त्यामुळं भारत 1 ऑगस्टपासून 25 टक्के टॅरिफ आणि वरील दंड भरावा लागेल, या प्रकरणात लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद. मेक अमेरिका ग्रेट अगेन.
दरम्यान, ट्रेड डीलबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये गेल्या बऱ्याच काळापासून चर्चा सुरु आहे. आता स्वतः ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवरुन याची एकतर्फी घोषणा केली आहे. विशेष म्हणजे याच आर्थिक वर्षात एप्रिल-जूनच्या तिमाहीत भारताची अमेरिकेत होणारी निर्यात २२.८ टक्क्यांहून वाढून २५.५१ अब्ज डॉलर झाली आहे. तर आयात ११.६८ टक्क्यांनी वाढून १२.८६ अब्ज डॉलर झाली आहे.
भाजपचे खादार प्रवीण खंडेलवाल यांनी यावर म्हटलं की, "यावर भारत सरकार नक्कीच काहीतरी पावलं उचलेलं. भारत सरकार अमेरिकच्या ट्रम्प प्रशासनासोबतही चर्चा करु शकतो. ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर निश्चितच वस्तू महाग होणार आहेत. पण आपल्याला याचा अभ्यास करावा लागेल की याचा बाजारावर काय परिणाम होईल. पण ट्रम्प यांनी भारतावर लावलेला हा टॅरिफ दुर्देवी असून पण मला आशा आहे की, लवकरच ट्रम्प प्रशासनाला आपल्या चुकीची जाणीव होईल आणि ते हा निर्णय मागे घेतील"
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.