Mumbai News : राज्यातील 29 महापालिकेसाठी गुरुवारी सकाळपासून उत्साहात मतदान केले जात आहे. त्यातच मतदान करीत असताना मतदारांच्या बोटावरील शाई पुसली जात असल्याचा प्रकार काही ठिकाणी पुढे आला आहे. त्यामुळे या प्रकाराबाबत मतदारातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
राज्यातील विरोधी पक्षाकडून निवडणूक आयोगाच्या कारभारावर शंका उपस्थित केली जात असतानाच हा प्रकार समोर आला आहे. त्याबाबत मीडियाशी बोलताना मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे या प्रकारावरून सीएम फडणवीसांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
राज्यातील महापलिका निवडणुकीसाठी गुरुवारी सकाळपासून मतदान सुरु आहे. या मतदानासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून शाईऐवजी मार्करचे किट उपलब्ध करुन देण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
हा मार्कर 2012 पासून प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वापरला जात असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली. मुंबईत मतदान करुन आलेल्या काही नागरिकांच्या बोटावरील शाई पुसली जात असल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी समोर आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकारबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.
या सर्व प्रकाराबाबत मनसेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी संताप व्यक्त केला आहे. सरकारने महापालिका निवडणुका जिंकायचे ठरविले आहे. जे विधानसभेला केले ते आता करत आहे पण आम्ही होऊ देणार नाही.
आजपर्यंत शाई लावली जायची, पण आता मार्करने खूण करण्यात येत आहे. सॅनिटाईजरने ही खूण पुसली जातेय. फ्रॉड निवडणुकांमधून सत्तेत येणे, याला निवडणुका म्हणत नाही, असा हल्लाबोल राज ठाकरेंनी केला.
याबाबत राज ठाकरेंनी केलेल्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुकांबाबत सगळ्या गोष्टी निवडणूक आयोग ठरवते. याआधीही मार्करचा वापर झाला आहे. जर काही न शंका असेल तर निवडणूक आयोगाने दुसऱ्या पेनचा वापर केला पाहिजे.
मी तर म्हणतो की, ऑईल पेंटचा वापर केला पाहिजे. मात्र निवडणुकीशी संबंधित संस्थानवर अशा पद्धतीने संशय निर्माण करणे योग्य नाही, असेही फडणवीसांनी सांगितले. माझ्या हातावरील मार्कर पुसून दाखवा, असेही फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, शाई पुसली जाते असे काही व्हिडिओ प्राप्त झाल्यानंतर पालिका आयुक्तांकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मार्करच्या मदतीने शाई लावली जात असल्याने शाई सहज पुसली जात असल्याचा मतदारांना संशय आहे.
शाई त्वचेला लागेल, अशी गडद लावा, अशा सूचना आता देण्यात आल्या आहेत. बोटावर लावण्यात असलेली शाई पुसली जात असल्याप्रकरणी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.