Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचे निवडणुकीच्या आधीच मोठे संकेत; म्हणाले, '...तर फडणवीसांसाठी 'मातोश्री'चे दरवाजे पुन्हा उघडतील!'

Devendra Fadnavis And Uddhav Thackeray: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी (ता.9) एका मुलाखतीत महापालिका निवडणुकीनंतर राज ठाकरे यांनी जर मला चहा प्यायला बोलावलं तर मी जाईन किंवा ते माझ्या घरी येतील.पण याचवेळी त्यांनी उद्धव ठाकरेंनी ‘मातोश्री’चे दरवाजे माझ्यासाठी 2019 मध्येच बंद केले आहेत,असं फडणवीस यांनी म्हटलं होतं.आता त्याच आरोपावर उद्धव ठाकरे यांनी पलटवार केला आहे.
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: राज्यातील 29 महापालिका निवडणुकांसाठीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुका जिंकण्यासाठी ताकद पणाला लावली आहे. यात ठाकरे बंधूंनीही आपले वैयक्तिक हेवेदावे बाजूला सारत मुंबईसह इतरही काही महापालिका निवडणुकांसाठी एकत्र येत भाजपसह महायुतीसमोर तगडं आव्हान उभं केलं आहे. शिवसेना मनसे युती झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी संयुक्त मुलाखतीनंतर नाशिकमधील पहिली सभाही गाजवली. याचदरम्यान,आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापलं असतानाच दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी सर्वात खळबळजनक विधान केलं आहे.

शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मी माणुसकी विसरणारा माणूस नाही. पण तुम्ही मातोश्री बदनाम करायला निघालात.मातोश्रीवर आरोप करायला निघाला,बदनाम करायला निघाला.ते तोंड बंद करा,तुमच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे उघडतील असं मोठं विधान ठाकरेंनी ऐन मुंबई महापालिका निवडणुकीसाठीचा प्रचार तापला असताना केल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले,आम्ही कधीच देवेंद्र फडणवीसांना दरवाजे बंद केलेले नाहीत.असं कधी झालं नाही. मित्रच होतो ना आम्ही.खरा मित्र कोण असतो जो वाईटाला वाईट सांगेल.वाईट करत असताना वाहवा करणारा मित्र नसतो. तो हितशत्रू असतो. हे हिंदुत्व बदनाम करतात,महाराष्ट्र बदनाम करतात, महाराष्ट्राची संस्कृती बदनाम करत आहात. मुंबई अदानीला विकू नका.मुंबईची अस्मिता कायम ठेवा. मातोश्रीचे दरवाजे उघडतील. आणि फडणवीसांना अगदी जेवायलाही बोलावेन,असंही त्यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांच्याविषयी मोठे विधान केलं. ते म्हणाले,मी वैयक्तिक शत्रूत्व कुणाशी का आणि का करू ?. पण ज्यावेळी तुम्ही पराकोटीचे विचित्र वागू लागता त्यावेळी सॉरी बाबा माझं नाही जमत. मी कुणाच्या जीवावर नाही उठलो. तुमचा पक्ष खतम करायला निघालो नाही. जसं तुम्ही वागत आहात अशी टीकेची तोफही ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) यावेळी डागली.

Uddhav Thackeray on Devendra Fadnavis
Badlapur News: टीकेनंतर भाजपला उपरती : बदलापूरमध्ये लैंगिक अत्याचारातील आरोपी नगरसेवकाचा 24 तासांत घेतला राजीनामा

ज्या मातोश्रीत शिवसेना आहे,ती खतम करायला निघाला. त्या मातोश्रीबाबत आता तुम्ही बोलता आहात? दरवाजाची गोष्ट करता आहात असा हल्लाबोलही उद्धव ठाकरेंनी यावेळी केला. ते म्हणाले,तेव्हा मी काय मागितलं होतं? मला काही मागितलं नव्हतं,जे काही मागितलं होतं,ते मी शिवसेनेसाठी मागितलं होतं. कारण मी बाळासाहेब ठाकरेंना वचन दिलं होतं. मात्र,तेच तुम्ही नंतर गद्दारी करून घेतलं. मग त्यांनी शिंदेंना मुख्यमंत्री केलं,शेवटी काय मिळवलं? भाजपनं एक मित्र गमावला”, अशी खदखदही उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवली. यावेळी वरती जे बसले होते, त्यांना सर्व माहीत आहे असल्याचंही म्हटलं.

तुम्ही त्यावेळी मातोश्रीच्या आतच होता. घरात घेऊन दार बंद केलं होतं. आता घराबाहेर जाऊन बंद केलं. शब्द मोडल्यामुळे मी दार बंद केलं, असा घणाघातही ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीस आणि गृहमंत्री अमित शहांवर केला.

Uddhav Thackeray on Devendra Fadnavis
Sangram Patil: मोदी सरकारला नडलेल्या डॉ. संग्राम पाटील यांना अटक! लंडनहून मुंबईत येताच एअरपोर्टवरून घेतलं ताब्यात

मातोश्रीचे दरवाजे तुमच्यासाठी उघडतील हे एवढ्यासाठी म्हणतोय कारण त्यांनी बकवास करणं बंद करावं. मातोश्रीला बदनाम करण्याचं काम बंद करावं,आमची कौटुंबिक बदनामी देखील बंद करावी, कारण मी कधीही कोणाची कौटुंबिक बदनामी केली नाही.माझ्याकडे माहिती असून देखील मी कोणाची कौटुंबिक बदनामी केली नाही आणि कधी करणार देखील नाही,असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी(ता.9) एका मुलाखतीत महापालिका निवडणुकीनंतर राज ठाकरे यांनी जर मला चहा प्यायला बोलावलं तर मी जाईन किंवा ते माझ्या घरी येतील.पण याचवेळी त्यांनी उद्धव ठाकरेंनी ‘मातोश्री’चे दरवाजे माझ्यासाठी 2019 मध्येच बंद केले आहेत,असं फडणवीस यांनी म्हटलं होतं.आता त्याच आरोपावर उद्धव ठाकरे यांनी पलटवार केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com