Mumbai News : केंद्र सरकारच्या कारभारावर टीका करताना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे युवा नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय यंत्रणांच्या वापरवरच आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी सीबीआय, आयटी हे भाजपचे पोपट आहेत. इडीला चंपत राय दिसत नाहीत, इडीला आता शेखर सुमन दिसतील. त्यांनी प्रश्न विचारला की सीबीआय चंपतराय किंवा मिश्रा यांच्या घरी का जात नाही आणि या सर्वांत भाजप व पंतप्रधान महोदयांची भूमिका काय आहे? असा सवाल करीत त्यांनी केंद्र सरकारच्या कारभाराची वाभाडे काढताना चांगलेच घेरले आहे.
मुंबईतील एका कार्यक्रमावेळी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर शेलक्या शब्दांत घणाघाती हल्ला चढवला. केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापरावर बोट ठेवत, 'CBI आणि Income Tax हे आता केवळ भाजपचे पोपट उरले आहेत', अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी थेट तोफ डागली.
त्यासोबतच यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, 'खरे हिंदूद्रोही आणि खरे देशद्रोही हे भाजपावालेच आहेत. जर हिम्मत असेल तर पहिले जाऊन अयोध्येमध्ये भाजपने मंदिराला का लुटलं याच्यावर प्रश्न विचारण्याची हिम्मत दाखवा. राम मंदिर हे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे बनले, भाजपने ना शासन केले ना कायदा आणला, पण भाजप क्रेडिट घेऊ इच्छिते. वाराणसीमध्ये अनेक मंदिरे तुम्ही कॉरिडॉरच्या नावाखाली सपाट केली आहेत. मुंबईतही मुंबा देवीच्या परिसरात कॉरिडॉरच्या नावाने भाजप जमिनी हिरावून घेऊ इच्छिते, त्याच्या विरोधातही आम्ही लढू, असा इशारा त्यांनी दिला.
भाजप (BJP) मेजॉरिटी मार्कच्या खाली आहे, देशाच्या जनतेने त्यांना 240 केले आहे. भाजपच्या मनात जी घृणा आहे ती आपल्या संविधानाबद्दल आहे, त्यांना संविधान बदलायचे आहे. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाऐवजी स्वतःचे भाजपचे संविधान या देशात आणायचे आहे आणि त्यासाठीच डीलिमिटेशन असो किंवा संविधान बदलण्याचे कार्यक्रम असो, सर्व खासदारांना किंवा आमदारांना खरेदी केले जात आहे, अशी टीका यावेळी आदित्य ठाकरे यांनी केली.
अयोध्येमध्ये जी लूट झाली आहे तिथूनच भाजपने पैसा चोरला आहे. उज्जैनमध्ये जी लूट आहे तिथूनच भाजप पैसा चोरत आहे. राम मंदिर बनल्यानंतर भाजपने जी ट्रस्ट बसवली, त्या दानपेटीतून तुम्ही धोतर सीसीटीव्हीवर लावून चोरी केली, असा आरोप आदित्य यांनी यावेळी केला.
भाजप नेत्यांनी आमिर खानला लक्ष्य केले आहे. त्यावर बोलताना ठाकरे म्हणाले, 'आमिर खानचे फोटो तर मोदी साहेबांसोबत आहेत, त्यांची चांगली मैत्री आहे. उज्जैनमध्ये 'लँड जिहाद' कोणी केला? तर भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी केला. उज्जैनच्या पावन भूमीला कोणी लुटले? तर भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी लुटले. आधीची भाजप जी अडवाणी, वाजपेयी साहेबांची, मुंडे काका-महाजन काकांची होती ती बदलली आहे. सध्याचे भाजपचे प्रमुख चेहरे हे मिक्सिंग वाले, इथेनॉल मिक्सिंग वाले चेहरे असल्याचे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.