Devendra Fadnavis sarkarnama
महाराष्ट्र

Abhishek Ghosalkar Murder Investigation: अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाच्या क्लोजर रिपोर्टसंदर्भात फडणवीसांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, 'वेगळा अँगल....'

Abhishek Ghosalkar Murder Case News : वर्षभरापूर्वी अभिषेक घोसाळकर यांची हत्या फेसबुक लाईव्ह दरम्यान झाली होती. हत्या करणारा आरोपी मॉरिस नोरोन्हा उर्फ मॉरिसभाईने यानेही स्वतःवर गोळ्या झाडल्या होत्या.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राज्यातील गुन्हेगारी विषयावर विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाचे मुंबईतील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा क्लोजर रिपोर्टसंदर्भात वक्तव्य केले आहे. वर्षभरापूर्वी अभिषेक घोसाळकर यांची हत्या फेसबुक लाईव्ह दरम्यान झाली होती. हत्या करणारा आरोपी मॉरिस नोरोन्हा उर्फ मॉरिसभाईने यानेही स्वतःवर गोळ्या झाडल्या होत्या. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावेळी त्यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या तपासाबाबत माहिती दिली.

शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे मुंबईतील माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव अभिषेक घोसाळकर यांची फेसबुक लाईव्ह दरम्यान हत्या झाली होती. हत्या करणारा आरोपी मॉरिस नोरोन्हा उर्फ मॉरिसभाईने यानेही स्वतःवर गोळ्या झाडल्या होत्या. या हत्या प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत माहिती दिली.

राज्यातील गुन्हेगारी विषयावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी घोसाळकर हत्या प्रकरणाच्या क्लोजर रिपोर्टसंदर्भात वक्तव्य केले. घोसाळकर संदर्भात आरोपपत्र दाखल केले आहे. तसेच जे आरोपी आहे त्याने फेसबुक लाईव्ह करून आत्महत्या केली. त्यामुळे क्लोजर रिपोर्टआधी काही वेगळा अँगल निघेल का? त्याचा तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूर येथील घटनेवर भाष्य केले. काही लोकांना जाणीवपूर्वक लक्ष करण्यात आले. त्या ठिकाणी औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर जाळली होती. परंतु जाणीवपूर्वक चुकीचा मेसेज व्हायरल करण्यात आला. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई केल्याशिवाय शांत बसणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

नागपूर येथील प्रकरणात पोलीस आयुक्तांशी चर्चा केली आहे. पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला त्यांना कबरीतून बाहेर शोधून काढू. आरोपींना इतर प्रकरणात माफी मिळेल, पण पोलिसांवरील हल्ल्याला माफी मिळणार नाही. नागपूर शहर शांत आहे. ते नेहमी शांत असते, असे फडणवीस यांनी सांगितले.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT