Abu Azami Sarkarnama
महाराष्ट्र

MVA News : महाविकास आघाडीवर अबू आझमीचे गंभीर आरोप; म्हणाले, 'आमचे कधीच ऐकले नाही...'

Political News : महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस व अबू आझमी यांचा समाजवादी पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस व अबू आझमी यांचा समाजवादी पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपची बी टीम आहे हे आधी सांगायला पाहिजे होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी सीट शेअरिंग करताना आम्हाला विचारले नाही. अखिलेश यादव यांच्याशी देखील कधी यांनी चर्चा केलेली नाही. 20 वर्ष आम्ही चुकीच्या लोकासोबत राहिलो. येत्या काळात आम्ही महानगरपालिका निवडणुकीसाठी तयारी करत आहोत. महाविकास आघाडी सरकार असताना देखील आमचे कधीच ऐकले नाही, असा गंभीर आरोप समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केला आहे. (MVA News)

प्रसार माध्यमाशी बोलताना त्यांनी समाजवादी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण आघाडी सरकारने दिले नाही. ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अद्याप आमच्याशी चर्चा केलेली नाही. 6 डिसेंबरला काळा दिवस मानतात ते जितेंद्र आव्हाड यांना विचारतील ? आता हिंदुत्वाबाबत कसे ट्विट केले आहे. बाबरी मशीद तोडणाऱ्या बरोबर आम्ही राहणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष व उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सांगितल्यानंतर महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असल्याचे अबू आझमी (Abu Azami) यांनी स्पष्ट केले. दोनच दिवसापूर्वी आझमी यांनी महाविकास आघाडीच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करीत आघाडीतून बाहेर पडणार असल्याची घोषणा केली होती.

दरम्यान, आझमी यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची भूमिका जाहीर केली होती. त्यावेळी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आझमी यांची समजूत काढली जाईल, असे सांगितले होते.

दुसरीकडे ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या भूमिकेवर सडकून टीका केली आहे. त्यांचा उल्लेख भाजपची बी टीम, असा केला आहे. त्यासोबतच अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष आमच्यासॊबत असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे येत्या काळात आता अबू आझमी काय भूमिका घेणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT