Kolhapur Mahayuti News : सहकारात सोयीचे राजकारण कुणाच्या फायद्यासाठी? मंत्रीपदाच्या वाटेत अडथळा

Political News : निवडणुकीचा निकाल लागून महिनाही उलटला नसताना कोल्हापूर जिल्ह्यात सोयीचा राजकारणाला अधिक रंग भरला आहे.
Hasan Mushrif, Vinay Kore, Satej Patil, Rajesh Kshirsagar, Dhanjay Mahadik
Hasan Mushrif, Vinay Kore, Satej Patil, Rajesh Kshirsagar, Dhanjay Mahadik Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : निवडणुकीचा निकाल लागून महिनाही उलटला नसताना कोल्हापूर जिल्ह्यात सोयीचा राजकारणाला अधिक रंग भरला आहे. निकालानंतर आठवडाभरातच आमदार हसन मुश्रीफ यांनी सहकारात कोणताही बदल होणार नसल्याचे संकेत दिले. तर राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी सहकारात देखील युती हवी असे वक्तव्य केले. मात्र, सहकारातील दोस्ताना हा नेमका कोणाच्या फायद्यासाठी? असा सवाल आता उपस्थित होत आहे. तर दुसरीकडून महायुतीमधील छुपे हात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय अंदाज घेत सोयीस्कर भूमिका घेणाऱ्या नेत्यांच्या मार्गात मंत्रीपदासाठी अडथळा ठरत आहेत.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळाल्यानंतर कधीकाळी सहकारावर महाडिक गटाची सत्ता असल्याने राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक (Dhanjay Mahadik) यांनी देखील गोकुळ दूध संघावर सत्ता बदलाचा दावा केला होता. मात्र, कागलचे आमदार हसन मुश्रीफ (Hasan Muashrif) यांनी हा दावा खोडून काढत त्यांच्या या विधानाला चपराक दिली होती.

Hasan Mushrif, Vinay Kore, Satej Patil, Rajesh Kshirsagar, Dhanjay Mahadik
Mahayuti Government : तीन आमदार, तरी भाजपला मिळाले होते विरोधी पक्षनेतेपद; महाराष्ट्रात काय होणार?

विधानसभा व सहकारातील निवडणुका वेगळ्या असल्याचे सांगत जिल्ह्यात सोयीचे राजकारण होण्याचे संकेत दिले. त्यामुळे मुश्रीफ यांच्यासह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, ‘जनसुराज्य’चे आमदार डॉ. विनय कोरे यांच्यातील ‘दोस्ताना’ कायम राहणार हे स्पष्ट केले होते.

Hasan Mushrif, Vinay Kore, Satej Patil, Rajesh Kshirsagar, Dhanjay Mahadik
Indapur News : इंदापुरात डीजेच्या दणदणाटात ‘ईव्हीएम’ची घोड्यावरून काढली मिरवणूक

ऐन विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडत असताना या तिघा नेत्यांनीही एकमेकांवरील थेट आरोप टाळले होते. त्यामुळे आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून महायुतीच्या सोयीस्कर नेत्याची निवड होण्यासाठी प्राधान्य आहे.

Hasan Mushrif, Vinay Kore, Satej Patil, Rajesh Kshirsagar, Dhanjay Mahadik
Mahayuti Government : महायुतीच्या नेत्यांना करावी लागणार तारेवरची कसरत; मंत्रीमंडळ विस्तार, खातेवाटपाकडे लक्ष

सोयीस्कर भूमिका घेणाऱ्या नेत्यांमुळे महाविकास आघाडीतील नेत्यांचा फायदा होऊ नये, याची विशेष काळजी घेतली जात आहे. त्यासंदर्भातील पूरक माहिती स्थानिक नेत्यांकडून घेण्याचे काम सुरू असल्याचेही सांगितले जाते. त्यामुळे महायुतीला पूरक असणाऱ्या चेहऱ्यालाच मंत्रीपदाची वाट सोपी असल्याचे सांगितले जाते.

Hasan Mushrif, Vinay Kore, Satej Patil, Rajesh Kshirsagar, Dhanjay Mahadik
Pune Crime News : पुण्यातील भाजप आमदाराच्या मामाचं भर चौकातून अपहरण; हडपसर पोलीस चौकीत गुन्हा दाखल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com