महाराष्ट्र

Bjp News : आशिष शेलारांनंतर भाजपने दिली मुख्य प्रतोदपदाची जबाबदारी 'या' नेत्यावर

Politcal News : मंत्रीमंडळाच्या खाते वाटपावरून भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तीन पक्षात चुरस असल्याने गेल्या तीन दिवसापासून चर्चा सुरूच असल्याचे समजते.

Sachin Waghmare

Nagpur news : नागपूरमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. राज्यात सध्या राजकीय घडामोडी मोठ्या वेगाने घडत आहेत. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटप कधी होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मंत्रीमंडळाच्या खाते वाटपावरून भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तीन पक्षात चुरस असल्याने गेल्या तीन दिवसापासून चर्चा सुरूच असल्याचे समजते. त्यातच आता भाजपने भाजपच्या मुख्य प्रतोदपदी रणधीर सावरकर यांची निवड केली आहे.

भाजपचे मुख्य प्रतोद असलेल्या आशिष शेलार यांनी मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. त्यामुळे त्यांच्या जागी भाजपच्या (Bjp) मुख्य प्रतोदपदी रणधीर सावरकर यांची निवड करण्यात आली आहे. रणधीर सावरकर हे अकोला पूर्वचे आमदार आहेत. या मतदार संघातून रणधीर सावरकर यांनी हॅट्ट्रिक केली आहे. अकोला पूर्व या मतदारसंघातून माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रेंचे भाचे रणधीर सावरकर हे गेल्या तीन टर्मपासून आमदार आहेत. या मतदारसंघातून सलग तीनवेळा त्यांनी विजय मिळवला आहे.

2014 मध्ये भाजप-शिवसेनेच्या युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात होता. या ठिकाणी 2014 मध्ये रणधीर सावरकर (Randhir Sawarkar) यांनी या मतदारसंघात पहिल्यांदाच भाजपचं कमळ फुलवले. गेल्या दहा वर्षांत आमदार रणधीर सावरकर यांनी मतदारसंघावर चांगलीच पकड बसवली आहे. अकोला जिल्ह्याच्या राजकारणात धोत्रे गटाचे 'चाणक्य' म्हणून जिल्ह्यात रणधीर सावरकर यांची ओळख आहे.

सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातुन त्यांनी भाजपला 27 हजार मतांची आघाडी मिळवून दिली होती. त्यामुळेच भाजपच्या हायकमांडने रणधीर रणधीर सावरकर यांच्यवर मोठी जबादारी देत त्यांची भाजपच्या मुख्य प्रतोदपदी नियुक्ती केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT