Chhagan Bhujbal : छगन भुजबळांनी पुढची दिशा ठरवली ? म्हणाले, 'या नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेणार'

Nashik Political News : मराठा समाजाच्या आरक्षणाला मी कधीच विरोध केला नाही, असे म्हणत त्यांनी संपूर्ण भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केले होते. त्यांच्या नावाचा उल्लेख न करता त्यांनी टीका केली.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : गेल्या दोन दिवसापासून अवहेलना झाल्याचे शल्य मनात डाचत आहे. चर्चा करून पाऊल उचलावे लागणार आहे. घाई न करता काय करायचे आहे ते विचारपूर्वक निर्णय घेणार आहे. याबाबत मुंबईतील नेत्यांशी चर्चा करून पुढील पाऊल उचलणार आहे. शेवटच्या श्वासापर्यंत मागासवर्गीयांसाठी लढत राहणार असून कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही, असेही माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

नाशिक येथील समता परिषदेच्या मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. मंत्रीपदाची हाव मला नाही. मंत्रिपदाची हाव जर मला असली असती तर 17 नोव्हेंबरला मी राजीनामा दिला नसता. मराठा समाजाच्या आरक्षणाला मी कधीच विरोध केला नाही, असे म्हणत त्यांनी संपूर्ण भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना लक्ष्य केले होते. त्यांच्या नावाचा उल्लेख न करता त्यांनी टीका केली.

Chhagan Bhujbal
MLC Satej Patil : वारं फिरलं...! काँग्रेसच्या सतेज पाटलांसाठी विधान परिषदेची तिसरी टर्म 2014, 2021 इतकी सोपी नसणार...

येत्या काळात मी संपूर्ण राज्यात फिरणार आहे. पुन्हा एकदा ओबीसी समाजासाठी एल्गार पुकारणार आहे. सर्व ओबीसी समाज एकजुटीने उभा राहिला म्हणून मी तुमच्यासमोर उभा राहिलो आहे. काही लोकांचे आपल्याविषयी वेगळे मत झाले आहे. ओबीसी समाजासाठी शेवटपर्यंत लढत राहणारी माणसे कमी असल्याचे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले

Chhagan Bhujbal
PM Narendra Modi : शहांच्या बचावासाठी पंतप्रधान मोदी सरसावले; आंबेडकरांवरून सुरू असलेल्या वादात उडी

पीएम नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी नाशिक लोकसभेसाठी माझे नाव घेतले होते. त्यामुळे या ठिकाणी तुम्हालाच उभे राहावे लागेल असा निरोप त्यांनी मला दिला होता. तिकीट नको असेल तर दिल्लीला जाऊन सांगा, असे त्यांनीच मला सांगितले होते. चार आठवडे झाले तरी मला काहीच निरोप आला नाही. त्यावेळी मी स्वतःच माझे निवडणुकीच्या रिंगणातून नाव मागे घेतले, असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chhagan Bhujbal
Santosh Deshmukh Murder Case : सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात चौथ्या आरोपीला अटक!

दोन वेळा राज्यसभेची उमेदवारी देताना मला टाळले. एकदा सुनेत्रा पवार यांना तर दुसऱ्यावेळी नितीन पाटील यांना राज्यसभेवर घेतले. त्यानंतर राज्यात तुमची गरज आहे. त्यामुळे विधानसभा लढवावी लागेल, असे मला सांगण्यात आले, असेही भुजबळ म्हणाले.

Chhagan Bhujbal
BJP on One Nation One Election : नेहरू, इंदिरा गांधी अन् राजीव गांधींचाही उल्लेख करत भाजपने सांगितलं 'वन नेशन, वन इलेक्शन' आणण्याचं कारण!

मी माझ्या लोकांना आज सोडू शकत नाही. मी संपूर्ण राज्यात फिरणार आहे. प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माझ्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुद्धा माझ्या मंत्रीपदासाठी प्रयत्न केले. मंत्रीपद कित्येकवेळा आले व गेले. काही काळ विरोधी पक्षातही बसलो, असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chhagan Bhujbal
Sharad Pawar Meet PM Modi : दिल्लीतील PM मोदींसोबतच्या भेटीत नेमकी चर्चा काय? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com