Nagpur News : नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु असतानाच राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटप कधी होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्यातच सत्ताधारी व विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर काही आमदारांना संधी न मिळाल्याने नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या एका माजी मंत्र्याने 'मी पुन्हा येईल' ची घोषणा करीत विरोधकांना थेट इशाराच दिला. (Shivsena News)
महायुतीने केलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना (Shivsena) शिंदे गटातील 12 जणांची मंत्रीपदी वर्णी लागली. त्यामुळे काही आमदार नाराज झाले आहेत. विशेषतः गेल्या अडीच वर्षाच्या काळात मंत्री असलेल्या तानाजी सावंत, दीपक केसरकर व अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले तर माजी मंत्री विजय शिवतारे, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार भोंडेकर यांची वर्णी न लागल्याने सर्वजण नाराज असल्याची चर्चा असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची नाराजी दूर केली आहे.
शिवसेना शिंदे गटाचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी अडीच वर्षांनी पुन्हा मंत्री होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यांच्या या वक्तव्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. इतकेच नाही तर, जास्त हुशार्या मारू नका, असा खोचक इशाराही त्यांनी यावेळी विरोधकांना दिला आहे.
राज्यातील महायुती सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार नुकताच झाला. यामध्ये अनेक नेत्यांचा पत्ता कट झाला तर काही नव्या चेहऱ्याना संधी मिळाली आहे. त्यामुळे कही खुशी, काही गम असे वातावरण पहावयास मिळत आहे. सिल्लोड येथील शिवसेना शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांची कॅबिनेटमध्ये वर्णी लागलेली नाही. त्यामुळे ते नाराज असतील असे वाटत होते.
त्यावर आता अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया देत विरोधकांना थेट इशारा दिला. सत्तार म्हणाले की, मी चौथ्यांदा विधानसभेत निवडून गेल्यानंतर सिल्लोडला मंत्रीपद मिळेल, अशी सगळ्यांनाच अपेक्षा होती. मात्र ते मिळाले नाही. त्यामुळे मी नाराज नाही आणि कार्यकर्त्यांनी नाराज राहू नये. मी अडीच वर्षानंतर पुन्हा मंत्री होईन असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.